esakal | आंदोलक शेतकऱ्यांची करनालपर्यंत धडक
sakal

बोलून बातमी शोधा

farmer protest

आंदोलक शेतकऱ्यांची करनालपर्यंत धडक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

करनाल (वृत्तसंस्था) ः स्थानिक प्रशासनाबरोबरील चर्चा फिसकटल्यानंतर शेतकऱ्यांनी मंगळवारी संध्याकाळी येथील जिल्हा मुख्यालयापर्यंत धडक मारली.

करनालमध्ये २८ ऑगस्ट रोजी आंदोलकांवर झालेल्या लाठीमार प्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांची आहे. हरियाना आणि जवळच्या राज्यांतील शेतकरी आज सकाळी महापंचायतीसाठी नव्या धान्य बाजारात पोहोचले. त्यानंतर शेतकऱ्यांच्या ११ सदस्यांच्या शिष्टमंडळाला प्रशासनाने चर्चेसाठी बोलावले. सुमारे तीन तास चाललेल्या चर्चेत तोडगा निघू शकला नाही,अशी माहिती जोगिंदरसिंग उग्रहान यांनी दिली.

हेही वाचा: मोदी सरकारविरोधात RSSच्या संघटना उतरणार रस्त्यावर

शेतकऱ्यांच्या मागण्या प्रशासनाने अमान्य केल्या. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी महापंचायतीच्या स्थानापासून पाच किलोमीटरवरील करनाल येथील जिल्हा मुख्यालयाकडे जाण्यास सुरुवात केली. शेकडो शेतकरी जिल्हा मुख्यालयाच्या दिशेने जाऊ लागताच त्यांना अडविण्यासाठी रस्त्यात अडथळे उभारण्यात आले. परंतु, ते अडथळे पार करून शेतकऱ्यांनी आपला मोर्चा कायम ठेवला. त्यामुळे पोलिसांनी शेतकरी नेते राकेश टिकैत आणि योगेंद्र यादव यांना ताब्यात घेतले. थोड्यावेळाने त्यांना सोडून देण्यात आले.

शेतकरी करनालमधील सचिवालयापर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना पांगविण्यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर पाण्याचा मारा केला. शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे हरियानातील पाच जिल्ह्यातील इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद करण्यात आली होती.

हेही वाचा: हरियाणामध्ये आंदोलक शेतकऱ्यांवर पुन्हा पाण्याचे फवारे

शेतकऱ्यांच्या मागण्या

  • बसताडा लाठीमारात मृत्युमखी पडलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना २५ लाखांची मदत द्यावी. तसेच परिवारातील एकाला सरकारी नोकरी द्यावी

  • संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी

  • जखमी शेतकऱ्यांना दोन लाख रुपये भरपाई द्यावी

loading image
go to top