केंद्रानं राज्यांकडून मागवला ऑक्सिजन अभावी झालेल्या मृत्यूंचा डेटा

हा डेटा पाठवण्यासाठी दिली डेडलाईन
corona death body
corona death bodycorona death body

नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं मृत्यू झालेल्या रुग्णांची आकडेवारी केंद्र सरकारने राज्यांकडे मागितली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं याबाबत सर्व राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना पत्र लिहिलं आहे. (Provide death data due to lack of oxygen by August 13 Centre writes to states aau85)

corona death body
युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळात 'ढोलविरा' शहराचा समावेश

आरोग्य मंत्र्यांनी आपल्या पत्रात म्हटलं की, "आम्ही राज्यांना आणि केंद्रशासित प्रदेशांना आज पत्र लिहून विचारणा केली आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं किती जणांचे मृत्यू झालेत याची माहिती पुरवावी" आम्हाला ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं झालेल्या मृत्यूंबाबत वारंवार विचारणा होत आहे, त्यामुळे आता ही माहिती मागवण्यात आली आहे.

डेटा पाठवण्यासाठी डेडलाईन

हा मृतांचा डेटा पाठवण्यासाठी काही डेडलाईन आहे का? या प्रश्नाचं उत्तर देताना आरोग्य मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "संसदेचं अधिवेशन संपण्यापूर्वी म्हणजेच १३ ऑगस्टपूर्वी हा डेटा राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी देणं अपेक्षित आहे."

corona death body
कोरोना महामारी संपण्याला अजून बराच काळ - आरोग्य मंत्रालय

गेल्या आठवड्यात काँग्रेसचे राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी प्रश्न विचारला होता. याला आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यसभेत लिखित उत्तर देताना "देशात ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं एकही मृत्यू झालेला नाही. आरोग्याचा विषय हा राज्यांच्या अखत्यारितील आहे. त्यामुळं सर्व राज्ये त्यांच्याकडील कोरोनाच्या रुग्णांचा डेटा आम्हाला पाठवत असतात," असं सांगितलं होतं. केंद्र सरकारच्या या उत्तरानंतर देशभरात मोठा गदारोळ झाला होता. अनेकांनी केंद्र सरकारवर टीका केली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com