अर्थसंकल्पाला स्थगिती देण्याबाबत तरतुदी मागवल्या

वृत्तसंस्था
शनिवार, 14 जानेवारी 2017

नवी दिल्ली : पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीमुळे केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यास स्थगिती देण्यासाठी दाखल केलेल्या याचिकेच्या समर्थनार्थ तपशील आणि कायदेशीर तरतुदी सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले.

सरन्यायाधीश जगदीशसिंह खेहर आणि न्यायाधीश धनंजय वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठाने सांगितले की, आज वकिलांनी आम्हाला सांगावे, की कोणत्या तरतुदींचा भंग करण्यात आला आहे. आम्हाला याचिकेच्या समर्थनार्थ कोणतेही तपशील मिळालेले नाहीत.

याचिकाकर्ता वकील मनोहर लाल शर्माला न्यायालयाने सांगितले की, तुम्ही वेळ घेऊन ठोस तयारी करा आणि नंतर आपल्या याचिकेच्या समर्थनार्थ तपशीलासह या. न्यायालयाने या याचिकेवरील सुनावणी 20 जानेवारीपर्यंत स्थगित केली.

Web Title: provisions sought over stay to budget