गुजरातमधील पोलिसाचा व्हिडिओ पाहून तुम्ही कराल सलाम

वृत्तसंस्था
Sunday, 11 August 2019

सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.

अहमदाबाद : गुजरातमध्ये मुसळधार पावसामुळे अनेक नद्यांना पूर आला असून, नागरिकांना सुरक्षितस्थळी हालविण्यात येत आहे. गुजरात पोलिस दलातील एका पोलसांनी दोन मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत सुरक्षितस्थळी नेल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

गुजरातमधील मोरबी जिल्ह्याला पावसाचा मोठा फटका बसला आहे. पुरस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांना स्थलांतरित करण्यात येत आहे. मोरबी जिल्ह्यातील कल्याणपर गावातील बचावकार्यादरम्यान पोलिस कॉन्स्टेबल पृथ्वीराज जडेजा दोन चिमुकल्या मुलींना खांद्यावर घेऊन पाण्यातून वाट काढत आहे. चोहोबाजूंनी पाणी असताना हा पोलिस कर्मचारी यांचे बचावकार्य सुरु असताना इतर नागरिकही पाण्यातून सुरक्षितस्थळी जात आहेत.

सोशल मीडियात हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला आहे. या पोलिसाच्या कृतीचे कौतुक करण्यात येत आहे. गुजरातमध्ये पावसामुळे अकराशे लोकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर केले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pruthviraj Jadeja Gujarat police constable carried two children on his shoulders