
खिशात पाचशे रुपये, संतूर वादनाचं वेड अन् मुंबईवारी; असा होता पं. शिवकुमारांचा प्रवास
संतूरवादक पंडीत शिवकुमार शर्मा यांचं वयाच्या ८४ व्या वर्षी आज मुंबईत निधन झालं, संतूरवादनाची धून त्यांनी संपूर्ण भारतात लोकप्रिय केली. संतूर हे वाद्य म्हणजे शततंत्री वीणा किंवा शंभर तारांची वीणा, याला फारसी भाषेत संतूर हे नाव मिळालं.
हे वाद्य सूफी संगीतामध्ये वापरलं जातं, काश्मीरचं लोकवाद्य म्हणूनही संतूर वाद्याची ओळख आहे. हे वाद्य हाताने वाजविलं जातं, यासाठी पुढून वाकलेल्या काड्यांचा वापर केला जातो. संतूरवादनाला भारतीय शास्त्रीय संगीताची जोड दिली, ती पं शिवकुमार शर्मा यांनी, भारतभर त्यांच्या संतूरवादनाची मोहीनी होती. वयाच्या अवघ्या पाचव्या वर्षी शिवकुमार यांनी तबलावादन आणि गायनाचे धडे घेण्यास सुरुवात केली. मात्र संतूरवादनात त्यांनी जास्त आवड निर्माण झाली. शिवकुमार शर्मा यांच्या वडीलांनाही शिवकुमार यांनी संतूरवादन शिकावं आणि त्याचा प्रसार करावा अशी इच्छा होती. शिवकुमार शर्मांनी ती इच्छा पूर्ण केली. (Pandit Shivkumar Sharma )
हेही वाचा: 'एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे
पुढे 'चांदणी' चित्रपटातील त्यांनी केलेलं संतूरवादन गाजलं, पं हरीप्रसाद चौरसिया आणि शिवकुमार शर्मा ही जोडी प्रसिद्ध होती. शिवकुमार शर्मांनी एका मुलाखतीत एक आठवण सांगितली होती, '' वडीलांची इच्छा होती, मी जम्मू किंवा श्रीनगर आकाशवाणीत सरकारी नोकरी करुन आरामदायी जीवन जगावं. पण शिवकुमार शर्मांना हे मान्य नव्हंतं .पं शिवकुमार शर्मांनी पाचशे रुपये घेउन मुंबई गाठली होती. सुरुवातीला अनेकजणांना संतूरवाद्य माहीतीच नव्हतं, कार्यक्रम मिळत नसायचे कधीकधी अर्धपोटी झोपावं लागायचं असं मुलाखतीत सांगितलं होतं.
Web Title: Pt Shivkumar Sharma Leave His Hometown Only With 500 Rupees
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..