'एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे Kedar Shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Shahir Sable & Lata Mangeshkar

'एकेकाळी लता दीदींपेक्षा शाहीर साबळेंचं मानधन जास्त होतं'- केदार शिंदे

निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदे ने (Kedar Shinde) आपले आजोबा 'लोकशाहीर' शाहीर साबळे(Shahir Sable) यांचा जीवनपट सिनेमाच्या माध्यमातून उलगडण्याची मोठी घोषणा काही दिवसांपूर्वी केली अन् लोकंसगीताची मान आपणहून उंचावली. केदार शिंदेच्या या सिनेमाचं नाव 'महाराष्ट्र शाहीर' असं असून यात अंकुश चौधरी मध्यवर्ती भूमिका साकारत आहे. या सिनेमाची आता सारेच मनापासून वाट पाहत आहेत. तितक्यात आता केदार शिंदेची आपले आजोबा शाहीर साबळे यांच्या आठवणी सांगणारी एक पोस्ट चर्चेत आली आहे. ज्यामध्ये केदार शिंदेनं शाहीर साबळे त्या काळात घेत असलेल्या मानधनाविषयी उल्लेख केला आहे. ज्यात त्यानं म्हटलं आहे की,लता मंगेशकर(Lata Mangeshkar) यांच्यापेक्षा एकेकाळी शाहीर साबळे यांचं मानधन जास्त होतं. नेमकं काय म्हणायचं आहे यातून केदारला. चला जाणून घेऊया सविस्तर.

हेही वाचा: Kashmir Files नवी Controversy; दिग्दर्शक शशी थरुर यांना 'माफी मागा' म्हणाले

प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक केदार शिंदेनं शाहीर साबळे यांच्या संदर्भात माहिती देणारी एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यानं 'बाबा' म्हणजे शाहिर साबळेंनी सिनेमाची गाणी का जास्त गायली नाहीत याविषयी सांगताना अनेक खुलासे केले आहेत. अर्थात या आठवणी शाहीर साबळे यांच्या कन्या आणि लेखिका वसुंधरा साबळे यांनी लिहिल्या आहेत. ज्या केदार शिंदेनं पोस्टच्या माध्यमातून सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत.

त्या पोस्टमध्ये लिहिलं आहे,शाहीर आणि चित्रपट पार्श्वगायन....

मराठी चित्रपटसृष्टीशी बाबा (शाहीर) तसे दूरच राहीले..त्यांच्या उमेदीच्या काळात त्यांना चित्रपटासाठी गाण म्हणायच्या भरपुर ऑफर येत असत पण बाबांनाच मुळात कुठल्याही प्रकारात बंदीस्त व्हायचच नव्हत..लोकगीत आणि प्रहसनं, लोकनाट्य,मुक्तनाट्य या जीवंत प्रकारांमधे ते स्वताला जास्त सहज सादर करु शकत होते पण मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर त्यांचे मीत्र असल्यामुळे त्यांना कुणालाही नकार देण फार अवघड जात असे. नंतर ते नावारुपाला आल्यावर गाण्यासाठी येणार्या ऑफरना नकार कसा द्यायचा या वीचारात ते पडले..त्याकाळी लता मंगेशकर,आशा भोसले यांचा मराठीतही बराच बोलबाला होता आणि लता मंगेशकर शाहीरांनी इंडस्ट्रीत येऊन गायक म्हणुन बस्तान बसवाव या साठी लता मंगेशकरही अग्रही होत्या पण शाहीरांना त्या वाटेला जायचच नव्हत म्हणुन त्यांनी त्यावेळी गाण्यासाठी सर्वात जास्त म्हणजे ३०० रुपये आकारणार्या लताबाईंपेक्षा जास्त म्हणजे ५०० रुपये फी आकारायला सुरवात केली आणि ही मात्रा बरोबर लागू पडली..इतके पैसे मोजण कुणालाही शक्य झाल नाही..

पण काही मीत्रांच्या अग्रहाखातर त्यांनी मोजकीच गाणी चित्रपटासाठी गायली..पवना काठचा धोंडी मधल " अंगात भरलय तुफान " हे " आम्ही देवा आंबेचे गोंधळी " हे आणि वावटळ चित्रपटातल " दादला नको गं बाई मला नवरा नको गं बाई " हे भारुड त्यांनी गायल..छोटा जवान या चित्रपटातल एक अप्रतीम मल्हारीगीत त्यांनी सुलोचना चव्हाण यांच्या साथीने गायल पण फक्त " वावटळ " या त्यांच्या आयुष्यातल्या पहिल्या आणि शेवटच्या चित्रपटात श्री.वसंत शिंदे यांच्या बरोबर " दादला नको गं बाई " हे भारुड त्यांनी पडद्यावरही स्वताच सादर केल...झटपट प्रसिध्दी आणि पैसा या जंजाळात शाहीर अडकले असते तर नक्कीच महाराष्ट्र अनेक लोकगीतांना मुकला असता एवढ मात्र नक्की..

त्यांनी चित्रपटासाठी आवाज दिलेला त्यांचा शेवटचा चित्रपट होता केदार शिंदेचा " अगंबाई अरेच्चा " आणि त्यात अजय अतुलच्या नवीन संगीत संयोजनाखाली त्यांनी एकेकाळी स्वताच गायीलेल गाण " मल्हारवारी " हे अजयसह गायल होत आणि त्यावेळी त्यांनी वयाची ऐंशी वर्ष पार केली होती..

हेही वाचा: Kashmir Files नवी Controversy; दिग्दर्शक शशी थरुर यांना 'माफी मागा' म्हणाले

'जय जय महाराष्ट्र माझा','जेजुरीच्या खंडेराया','या गो दांड्यावरन' अशी एकापेक्षा एक लोकप्रिय गाण्यांचा ठेवा दिलेले शाहिर साबळे सिनेमांपेक्षा लोकसंगीतात अधिक रमले. त्यांनी लोकसंगीताला एका सर्वोच्च स्थानावर नेण्याचं अमूल्य काम केलं. शाहिर साबळेंविषयी लोकसंगीता व्यतिरिक्त खास जाणून घ्यायचं झालं तर,ते लहानपणापासूनच सामाजिक चळवळींशी जोडले गेले होते. साने गुरुजी,क्रांतीसिंह नाना पाटील,भाऊराव पाटील,सेनापती बापट यांचा सहवास त्यांना लाभला. १९४२ च्या चले जाव चळवळीत,स्वातंत्र्यानंतर गोवा आणि हैदराबाद मुक्तीसंग्राम,संयुक्त महाराष्ट्र चळवळीतही त्यांचा सक्रिय सहभाग होता. संयुक्त 'महाराष्ट चळवळीची तोफ' अशी शाहिरांची ओळख होती. लोककलेच्या क्षेत्रात मोलाचं योगदान दिल्यानिमित्तानं त्यांना पद्मश्री,संगीत नाटक अकादमी,महाराष्ट्र गौरव अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं.

Web Title: Kedar Shinde Post On Shahir Sable And Lata

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top