'पीटीआय'लाही ठरवतायत देशद्रोही? प्रसार भारतीने दिला निर्वाणीचा इशारा

PTI coverage not in national interest, will review ties says Prasar Bharati
PTI coverage not in national interest, will review ties says Prasar Bharati
Updated on

नवी दिल्ली : भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय' वृत्तसंस्थेकडून घेण्यात आलेल्या चिनी राजदुतांच्या मुलाखतीवरुन नवा वाद निर्माण झाला आहे. 'पीटीआय'चे हे वार्तांकन राष्ट्रविरोधी आणि देशाच्या अखंडतेस बाधा आणणारे असल्याचा आरोप प्रसार भारतीने केला आहे. त्यामुळे भविष्यात प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेशी असलेल्या कराराचा फेरआढावा घेऊ, असा इशाराच प्रसार भारतीकडून देण्यात आला आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

प्रसार भारतीकडून यासंदर्भात पीटीआयला पत्र पाठवण्यात आले आहे. आम्ही लवकरच या पत्राला उत्तर देऊ, असे 'पीटीआय'कडून सांगण्यात आले. प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे. मात्र, आम्ही लवकरच प्रसारभारतीसमोर तथ्य आणि खऱ्या गोष्टी मांडू, असे  'पीटीआय'ने म्हटले आहे. भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर 'पीटीआय'कडून चीनचे राजदूत सन वेडाँग यांची मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये वेडाँग यांनी भारतावर आरोप केले होते. त्यामुळे पीटीआय वादात सापडली आहे.
--------------
प्रत्येक रविवारी होणार लॉकडाऊन; राज्य सरकारचा मोठा निर्णय
--------------
कोरोना रुग्णांची संख्या १ कोटीवर; तर मृत्यूंची संख्या...
--------------
प्रसारभारतीच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, पीटीआयने सदर मुलाखत प्रसारित करताना त्याच्या संपादनात चुका केल्या, यापूर्वीही अशा चुका त्यांनी केलेल्या आहेत. त्यांनी सार्वजनिक हितास बाधा आणणाऱ्या बातम्या दिल्या आहेत. २०१६-१७ मध्ये आम्ही ९ कोटी वार्षिक वर्गणीचे सुसूत्रीकरण करण्याची मागणी केली होती, पण, पीटीआयने आडमुठी भूमिका घेतली. त्यामुळे आम्ही २०१७-१८ मध्ये त्यांची वर्गणी २५ टक्के कमी केली. प्रसारभारतीच्या अधिकाऱ्याने म्हटले आहे की, पीटीआयच्या मंडळात पत्रकारांचा समावेश असून स्वतंत्र संचालक नाहीत, प्रसारभारतीला त्यात प्रतिनिधित्व नाही. पण प्रसारभारती पीटीआयला सर्वात अधिक पैसे देत आहे.

पीटीआयविषयी..
पीटीआय वृत्तसंस्था देश-परदेशात लोकप्रिय असून त्यांचे ४०० पत्रकार व पाचशे अंशकालीन वार्ताहर आहेत. दिवसाला ते २ हजार बातम्या व २०० छायाचित्रे देतात. अनेक परदेशी वृत्तसंस्थांशी पीटीआयचे परदेशी बातम्यांसाठी करार आहेत. १९४७ मध्ये पीटीआयची नोंदणी झाली व या वृत्तसंस्थेचे काम १९४९ मध्ये सुरू झाले. या वृत्तसंस्थेचे संचालक मंडळ असून मुख्य कार्यकारी अधिकारी रोजचे काम पाहतात.

प्रसारभारतीविषयी....
प्रसारभारती ही आकाशवाणी व दूरदर्शन यांचे नियंत्रण करणारी संस्था आहे. 

प्रसारभारती म्हणते....
आम्ही पीटीआयला ६.७५ कोटी रुपये वार्षिक वर्गणी देतो. पीटीआयचे प्रमुख संपादक विजय जोशी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून अद्याप कुठला प्रतिसाद मिळालेला नाही. पण, पीटीआय वृत्तसंस्थेने चिनी राजदूताची जी मुलाखत प्रसारित केली त्याचे समर्थन केले आहे. प्रसारभारती कायदा १९९०च्या कलम १२ मध्ये ज्या मूल्यांचा उल्लेख केला आहे, त्याची पीटीआय वृत्तसंस्थेने पायमल्ली केली आहे. त्यामुळे यापुढे आम्हाला पीटीआयची सेवा सुरू ठेवण्यात स्वारस्य वाटत नाही. प्रसारभारती कायदा कलम १२ २(अ) अन्वये सार्वजनिक सेवा प्रसारकाने त्याची कामे करताना देशाची एकता व अखंडता याला बाधा येईल असे काही करू नये. प्रसारभारतीने शनिवारी पीटीआयला एक पत्र पाठवले असून त्यात म्हटले आहे की, तुम्ही प्रसारित केलेल्या बातमीत देशहिताच्या विरोधात आरोप करण्यात आले होते. त्यामुळे देशाच्या प्रादेशिक एकात्मतेला बाधा आली असून आता पीटीआयबरोबरच्या कराराचा फेरआढावा घेण्याची वेळ आली आहे.

पीटीआय म्हणते..
प्रसारभारतीची भूमिका आणि कराराच्या फेरआढाव्याचा विचार अन्याय्य व चुकीचा आहे. चिनी राजदूतांची जी मुलाखत घेतली होती, त्याचा एकतर्फी भाग चिनी दूतावासाने प्रसारित केला. त्याच्या आधारे वृत्तसंस्थेवर एकतर्फी टीका होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com