गोल्ड मेडल जिंकणाऱ्या 'तिचा' फक्त एवढाच दोष; पदक नाकारून कार्यक्रमातूनही बाहेर

PU Student Rejects Gold Medal to Support Anti CAA & NRC Protests
PU Student Rejects Gold Medal to Support Anti CAA & NRC Protests

पाँडिचेरी : सीएए आणि एनआरसीविरोधात देशभरात आंदोलन सुरू असतानाच पाँडिचेरी विद्यापीठाची विद्यार्थीनीसोबतची विचित्र वागणूक समोर आली आहे. विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभास राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते कार्यक्रमास येताच विद्यापीठाची गोल्ड मेडलिस्ट रबीहा अब्दुरहिम या विद्यार्थीनीला कार्यक्रमातून बाहेर काढण्यात आले. अशा वर्तणूकीमुळे तिने गोल्ड मेडल स्विकारण्यास नकार दिला आहे. 

पाँडिचेरी विद्यापीठाने 2018 या शैक्षणिक वर्षात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा दीक्षांत समारंभ काल म्हणजेच 23 डिसेंबरला आयोजित केला होता. यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना आमंत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमादरम्यान मास कम्युनिकेशन विभागाची पदव्युत्तर गोल्ड मेडलिस्ट रबीहा या विद्यार्थीनीला बाहेर काढण्यात आले. तिला बाहेर का काढण्यात आले, याबाबत मात्र नक्की कारण कळू शकले नाही. राष्ट्रपतींच्या सुरक्षिततेचा प्रोटोकॉल म्हणून असे करावे लागले असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  

काही जणांचे म्हणणे पडले की, ती मुस्लिम आहे म्हणून बाहेर काढले, तर काहींचे म्हणणे आहे की तिने स्कार्फ बांधला होता म्हणून बाहेर काढले. पण रबीहाने या सगळ्या शक्यता नाकारत तिने सीएएसा विरोध केल्याने असा प्रकार घडल्याचे सांगितले. 

रबीहाला राष्ट्रपती येण्याआधी काही मिनिटे पोलिसांनी बाहेर जाण्यास सांगितले. तिला बाहेर काढून दार बंद करण्यात आले. तिला हा सगळा प्रकार काय घडत आहे, काही कळत नव्हते. तिने बाहेर थांबलेल्या पोलिसांना विचारले, तर त्यांनाही काही कल्पना नव्हती. नंतर बक्षीस समारंभावेळी तिला स्टेजवर बोलविण्यात आले, तेव्हा तिने प्रमुख पाहुण्यांचा आदर राखत मी हे मेडल स्विकारू शकत नाही. सीएएविरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अमानुष अत्याचार केला गेला, या घटनेचा निषेध म्हणून मी हे मेडल स्विकारणार नाही, असे तिने राष्ट्रपतींना सांगितले.

चेन्नईतही घडला असाच प्रकार
मद्रास आयआयटीच्या कॅम्पसमध्ये CAAविरुद्ध करण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी झालेल्या एका जर्मन विद्यार्थ्याला चक्क देश सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहे. या विद्यार्थ्याचे नाव जेकब लिंथेडल असे आहे. तो मद्रास आयआयटीत भौतिकशास्त्राच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे (मास्टर्स) शिक्षण घेत होता. काही दिवसांपूर्वी त्यांच्या विद्यापीठात CAAविरुद्ध झालेल्या आंदोलनात तो सहभागी झाला होता. मात्र, आता त्याला असे केल्यामुळे थेट भारत सोडून जाण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com