बेदी यू गो ! राज्यपाल किरण बेदींविरोधात काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांचे आंदोलन

सकाळ ऑनलाइन टीम
Sunday, 10 January 2021

किरण बेदी या सरकारला काम करु देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शुक्रवारपासून राज भवनासमोर सुरु असलेले आंदोलन आज रविवारीही सुरुच आहे. 

नवी दिल्ली- पुद्दूचेरीचे मुख्यमंत्री व्ही नारायणसामी आणि नायब राज्यपाल किरण बेदी यांच्यातील वाद वाढताना दिसत आहे. लोकनियुक्त सरकारला किरण बेदी काम करु देत नसल्याचा आरोप मुख्यमंत्री नारायणसामी गेल्या अनेक महिन्यांपासून करत आहेत. परंतु, आता त्यांनीच बेदी यांच्याविरोधात आंदोलन सुरु केले आहे. व्ही नारायणसामी यांनी नायब किरण बेदी यांना परत बोलावण्याची मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. शुक्रवारपासून राज भवनासमोर सुरु असलेले आंदोलन आज रविवारीही सुरुच आहे. 

पुद्दूचेरीमध्ये सत्ताधारी काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडीने राज्यपाल किरण बेदी यांच्याविरोधात शुक्रवारपासून आंदोलन सुरु केले आहे. किरण बेदी या सरकारला काम करु देत नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. या आंदोलनात मुख्यमंत्री नारायणसामी यांच्याबरोबर पुद्दूचेरीचे खासदार व्ही वैथिलिंगम, काँग्रेस आमदार टी जयमूर्ती, माकपा, भाकपा आणि व्हीसीकेचे नेतेही सहभागी झाले आहेत. या आंदोलनात सत्ताधारी काँग्रेसचे सहकारी पक्ष द्रमूकचे नेते आणि कार्यकर्ते सामील झालेले नाहीत. आंदोलनात सहभागी झालेल्या नेत्यांच्या हातात पोस्टर्स आहेत. यावर "कॉर्पोरेट मोदी छोड़ो! छोड़ो!, किरण बेदी को बुलाओ" असे लिहिलेले आहे. 

हेही वाचा- देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील यांच्या सुरक्षेत कपात; भाजपचा सरकारवर हल्लाबोल

पुद्दूचेरीत काँग्रेसच्या नेतृत्त्वाखाली धर्मनिरपेक्ष लोकशाही आघाडीचे सरकार आहे. नायब राज्यपाल किरण बेदी या सरकारच्या विकास योजना आणि कल्याणकारी निर्णयाला रोखतात असा आरोप आहे. यापूर्वीही सरकार आणि बेदी यांच्यात अनेकवेळा संघर्ष निर्माण झाला आहे. तरीही केंद्राने एकदाही याची दखल घेतलेली नाही. 

हेही वाचा- बहिणीच्या लग्नाकरिता फटाके आणण्यासाठी गेला, तो 'गेलाच'


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Puducherry CM V Narayanasamy protest demanding Centre to call back Lieutenant Governor Kiran Bedi