Pulwama terror attack: बस आता युद्धच हवं: गौतम गंभीर

वृत्तसंस्था
शुक्रवार, 15 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध व्यक्त करत हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी सलामीवीर गौतम गंभीर यांनी बस आता युद्धच हवं, असे म्हटले आहे. गंभीरसह अनेक खेळाडूंनी ट्वीटरवर तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत.

पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पण, सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी? असा सवाल देशवासीय करू लागले आहेत. खेळाडूंनी 'पाकिस्तानशी आता चर्चा करण्यात वेळ दवडू नका, आता चर्चा नको, तर युद्धच पुकारा!', अशा संतप्त प्रतिक्रिया खेळांडून दिल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pulawama terror attack: Enough is enough says Gautam Gambhir