१४ फेब्रवारी २०१९ ही तारीख कोणताही भारतीय नागरिक विसरू शकत नाही. याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात भारतीय निमलष्करी दलाचे ४० जवान शहीद झाले होते. आज या घटनेला सहा वर्ष पूर्ण झाली आहेत. मात्र, या हल्ल्याच्या जखमा आजही प्रत्येकाच्या मनात ताज्या आहेत.