Pulwama Attack: 'जैश'च्या 5 दहशतवाद्यांना जन्मठेप; पुलवामात 40 जवान झाले होते शहीद

जवानांच्या हालचालींबाबत ज्या दहशतवाद्यानं माहिती पुरवली होती त्याचाही यामध्ये समावेश
Pulwama terror attack 42 CRPF jawans martyred
Pulwama terror attack 42 CRPF jawans martyred
Updated on

नवी दिल्ली : सीआरपीएफच्या जवानांवर जम्मू काश्मीरमधील पुलवामा इथं झालेल्या हल्ल्यात ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याप्रकरणी 'जैश ए मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या पाच दहशतवाद्यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टानं सोमवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. नेटवर्क 18 या वेबसाईटनं याबाबत वृत्त दिलं आहे. (Pulwama Attack Life imprisonment for 5 terrorists of Jaish e Mohmmad 40 jawans were martyred in this attack)

Pulwama terror attack 42 CRPF jawans martyred
Bhagat Singh Koshyari: राज्यपालांच्या पदमुक्तीची चर्चा; राजभवनानं केला खुलासा

पुलवामातील सीआरपीएफच्या जवानांच्या ताफ्यावर हल्ला करणे आणि कट रचल्याबद्दल कोर्टानं ही शिक्षा सुनावली आहे. या पाच दहशतवाद्यांमध्ये सज्जाद अहमद खान याच्या नावाचाही समावेश आहे. ज्यानं पुलवामाच्या हल्ल्यादरम्यान सुरक्षा रक्षकांच्या हालचालींबाबत माहिती दिली होती.

Pulwama terror attack 42 CRPF jawans martyred
Shraddha Murder Case : दिल्ली पोलिसांना मोठं यश! ज्यानं श्रद्धाच्या शरीराचे तुकडे केले ते हत्यार जप्त

कोर्टानं या पाच दहशतवाद्यांना देशभरात केलेल्या दहशतवादी कारवाया आणि यासाठी तरुणांना प्रशिक्षण दिल्याप्रकरणी दोषी ठरवलं आहे. विशेष न्यायाधीश शैलेंद्र मलिक यांनी सज्जाद खान, बिलाल मीर, मुजफ्फर भट, इशफाक भट आणि मेहराजुद्दीन यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हेही वाचा - काय घडलं होतं उदयनराजेंच्या जलमंदिर पॅलेसमध्ये १९५२ साली?

या प्रकरणी कोर्टानं म्हटलं की, सर्व दोषींनी मिळून भारताविरोधात युद्ध छेडण्याचा कट रचला. यामध्ये दोषी केवळ जैशचे सदस्य नव्हते तर ते दहशतवाद्यांना हत्यारं पुरवून त्यांना सहकार्य करत होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com