कॅन्सरग्रस्त मातेला मुलगा हुतात्मा झाल्याचे कसे सांगावे?

pulwama terror attack martyred avadhesh yadav mother suffering cancer still waiting for son
pulwama terror attack martyred avadhesh yadav mother suffering cancer still waiting for son

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 42 जवान हुतात्मा झाले असून, यामध्ये अवधेश यादव यांचा समावेश आहे. यादव यांची आई कॅन्सरग्रस्त असून, त्यांना मुलगा हुतात्मा झाला आहे, हे सांगण्याचे कोणाला धाडस होत नाही.

उत्तर प्रदेशमधील बहादूरपूर हे अवधेश कुमार यादव यांचे गाव. अवधेश यादव 45व्या बटालियनमध्ये तैनात होते. हुतात्मा जवान अवधेश यादव यांची आई कॅन्सर पीडित आहे. अवधेश यांच्या आईला मुलगा देशासाठी हुतात्मा झाला आहे, हे अद्याप माहित नाही. कॅन्सरग्रस्त असल्यामुळे त्यांना मुलगा हुतात्मा झाल्याचे सांगण्याचे कोणाचे धाडस होत नाही. अद्यापही त्या मुलाच्या वाटेकडे डोळे लावून बसल्या आहेत.

अवधेश हुतात्मा झाल्याचे समजल्यानंतर गावात स्मशान शांतता पसरली आहे. अवधेश यादव हे नुकतेच सुट्टीवर आले होते. सुटी संपून ते 12 फेब्रुवारीला पुन्हा रुजू झाले होते. काश्मीरमध्ये तैनात असलेल्या कमांडो वेद प्रकाश यांनी अवधेश हुतात्मा झाल्याची माहिती दिली. अवधेश यादव 2010 मध्ये लष्करात भरती झाले होते. ते सीआरपीएफच्या 45व्या बटालियनमध्ये रेडिओ ऑपरेटरपदावर कार्यरत आहेत. त्यांच्या मागे पत्नी शिल्पी, दोन वर्षांचा मुलगा निखील, आई, वडील, दोन बहिणी व भाऊ असा परिवार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com