मोदीसाहेब, तुम्ही बदला घेणार पण कधी?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 16 फेब्रुवारी 2019

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात 42 जवान हुतात्मा झाले असून, देशभरात संतापाची लाट उसळली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हल्ला विसरणार नसून, बदला घेणार म्हणून सांगितले. पण, मोदीसाहेब, तुम्ही बदला घेणार पण कधी? अशी विचारणा नेटिझन्स करू लागले आहेत.

पुलवामातील दहशतवादी हल्ल्याचा पाकिस्तानात घुसून बदला घ्या, त्यांना धडा शिकवा,’ अशा संतप्त प्रतिक्रिया देशभरातून उमटत आहेत. ‘हा हल्ला विसरणार नाही, बदला घेऊ’, असा स्पष्ट इशारा ‘सीआरपीएफ’ने दिला, तर ‘दहशतवादी संघटना आणि त्यांच्या पाठीराख्यांनी मोठी चूक केली आहे. त्यांना मोठी किंमत चुकवावी लागेल, असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कारवाईची दिशा स्पष्ट केली. पाकिस्तानला असलेला ‘सर्वाधिक प्राधान्य देशाचा’ दिलेला दर्जा भारताने तातडीने रद्द केला आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर पाकिस्तानची नाचक्की होत आहे. अमेरिका, रशियासह जवळपास चीन सोडून सर्वच देशांनी भारताला दहशतवादी हल्ला मोडून काढण्यासाठी पाठिंबा दिला आहे. देशातील जनता रस्त्यावर उतरली असून, दहशतवादाविरोधात संताप व्यक्त करत आहेत. सोशल मीडियावर नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत.

पाकिस्तानचा बदला घेण्याची वेळ आता आली आहे. आता नाही तर कधीच नाही. मोदी साहेब किमान तीन दिवस तरी तुमचे उद्घाटनांचे कार्यक्रम रद्द करा. मोदीसाहेब, आमचे जवान हुतात्मा झालेत, काही तरी करा... थेट घुसा अन् हल्ला करा... आमच्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाऊ देऊ नका... पुलवामामध्ये रक्ताच्या सडाचा सूड घ्या... मोदी साहेब हिच वेळ आहे घुसून मारण्याची... अशा प्रकारच्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर पहायला मिळत आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pulwama Terror Attack : Modi saheb, will you take revenge but when?