Pulwama terror attack: सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी?

Pulwama terror attack 44 CRPF jawans martyred
Pulwama terror attack 44 CRPF jawans martyred

नवी दिल्लीः जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्याने केलेल्या भ्याड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 44 जवान हुतात्मा झाल्यानंतर देशात संतापाची लाट उसळली आहे. शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. पण, सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी? असा सवाल देशवासीय करू लागले आहेत.

दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या सुरक्षा समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी पाकिस्तानचे नाव न घेता शेजारील देशाला याची मोठी किंमत मोजावी लागेल. या हल्याच्या मागे जे आहेत त्यांन शिक्षा मिळणारच असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. देशासाठी ही वेळ संवेदनशिल आहे. या हल्यानंतर देशाची मनस्थिती आणि देशातील वातावरण दु:ख आणि आक्रोशाने भरलेले आहे. या परिस्थितीचा आपण सर्वांनी मिळून सामना करायला हवा. या परिस्थितिचे राजकारण होता कामा नये, असेही मोदींनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. 2004 नंतर जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी हा एवढा मोठा हल्ला घडवला आहे. उरीनंतरचा हा भारतावरचा सर्वात मोठा हल्ला मानला जात आहे. आदिल अहमद दार उर्फ वकास या दहशतवाद्याने हा हल्ला घडवला. आदिल अहमद हा 2016नंतर दहशतवादी संघटनेत भरती झाला होता. आदिलने स्फोटांनी भरलेली मोटार सीआरपीएफच्या ताफ्याच्या दिशेने नेली आणि ताफ्याजवळ जाताच स्फोट घडवून आणला. दार याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, तो पाहून नेटिझन्सच्या संतापामध्ये आणखी भर पडत आहे.

दहशतवादी हल्ल्यानंतर ट्‌वीटरवर #RIPBraveHearts,  #PhulwamaTerrorAttack, #CRPFJawans, #KashmirTerrorAttack, #Awantipora हे टॉप टेनमध्ये ट्रेण्ड आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्यावर नेटिझन्स व्यक्त होऊ लागले आहेत. जवानांच्या बलीदानाची किंमत व्यर्थ जाऊ न देता बदला घ्यायलाच हवा. सर्जिकल स्ट्राइक 2.0 कधी? असा प्रश्न देशवासीय करू लागले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com