पुणे विमानतळाचे विस्तारीकरण

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 3 मे 2018

नवी दिल्ली - चेन्नई, लखनौ, गुवाहाटी या विमानतळांच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. येत्या पाच वर्षांत पुणे, कोल्हापूरसह वीस विमानतळांच्या विस्ताराचे सरकारचे नियोजन आहे. 

नवी दिल्ली - चेन्नई, लखनौ, गुवाहाटी या विमानतळांच्या विस्तारीकरण व आधुनिकीकरणाच्या निर्णयावर केंद्रीय मंत्रिमंडळाने आज शिक्कामोर्तब केले. येत्या पाच वर्षांत पुणे, कोल्हापूरसह वीस विमानतळांच्या विस्ताराचे सरकारचे नियोजन आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत विमानतळ आधुनिकीकरणासोबतच, भारतीय खाण प्राधिकरणाची (ब्यूरो ऑफ इंडियन माईन्स) पुनर्रचना, उद्योगानुकूलता वाढविण्यासाठी जिल्हा पातळीवर व्यावसायिक न्यायालये सुरू करण्याची तरतूद असलेल्या अध्यादेशाला मान्यता; तसेच प्रधानमंत्री व्यय वंदन योजना, प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेला मुदतवाढ आदी निर्णयही झाले. 

चार-पाच वर्षांत आगरताळा, पाटणा, श्रीनगर, पुणे, त्रिची, विजयवाडा, पोर्टब्लेअर, जयपूर, मंगळूर, डेहराडून, जबलपूर, कोल्हापूर, गोवा, रुप्सी, लेह, कोझिकोड, इम्फाळ, वाराणसी, भुवनेश्‍वर या विमानतळांचाही विस्तार होणार आहे. यासाठी २०१७८ कोटी रुपये खर्च अपेक्षित आहेत. 

जूनमध्ये काम सुरू
लोहगाव विमानतळाच्या नव्या इमारतीसाठी १५ मे पर्यंत निविदा जागतिक स्तरावर प्रसिद्ध होतील. ४५ दिवस त्यांची मुदत असेल. जूनपर्यंत कामाला सुरवात होईल. 

नवी इमारत अशी असेल
लोहगाव विमानतळाच्या सध्याच्या  इमारतीशेजारी पूूर्वेकडे सुमारे ४२ हजार चौरस फुटांची नवी इमारत 
पहिल्या मजल्यावर बोर्डिंगची व्यवस्था 
दुसऱ्या मजल्यावर प्रवासी सुविधा
इमारतीत रेस्टॉरंट, दुकाने, आणि स्वच्छतागृहांचाही समावेश
प्रवाशांच्या सामानाची वाहतूकीसाठी ४-५ नवे कन्व्हेर बेल्ट
प्रवाशांना बसण्यासाठी खास व्यवस्था
५ नवे एरोब्रिज 

Web Title: pune airport Expansion