1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी शिक्षा कायम

वृत्तसंस्था
गुरुवार, 29 नोव्हेंबर 2018

नवी दिल्ली : 1984 च्या शीखविरोधी दंगलप्रकरणी सुमारे 80 जणांना दोषी ठरवण्याची आणि पाच वर्षांची तुरुंगवासाची शिक्षा देण्याचा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने आज कायम ठेवला. कनिष्ट न्यायालयाने घराची जाळपोळ करणे, हिंसाचार, दंगल घडवून आणणे, संचारबंदीच्या नियमाचे उल्लंघन केल्याप्रकरणी 80 जणांना दोषी ठरविले होते. 

कनिष्ट न्यायालयाच्या निकालाविरुद्ध दोषींनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळून लावत शिक्षा कायम ठेवली. न्यायाधीश आर. के. गौबा यांनी 22 वर्षे जुनी याचिका फेटाळून लावत सर्व दोषींना येत्या चार आठवड्यात शरण येण्याचे निर्देश दिले आहेत. पूर्व दिल्लीतील 31 ऑक्‍टोबर 1984 रोजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत अनेक भागांत दंगली उसळल्या होत्या.

त्रिलोकपुरी भागात दंगल घडवणे, घरांची जाळपोळ करणे आणि संचारबंदीचे उल्लंघन केल्याप्रकरणी 2 नोव्हेंबर 1984 रोजी 107 जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी 88 जणांना 27 ऑगस्ट 1996 रोजी कनिष्ट न्यायालयाने दोषी ठरविले होते. या निकालाविरुद्ध दोषींनी आव्हान दिले होते. त्रिलोकपुरी दंगलीत 95 जणांचा मृत्यू झाला होता. 

Web Title: The punishment for 1984 anti Sikh riots continued