'मला सर्व पदावरून काढून टाका'; 'आप'च्या प्रवक्‍त्याची मागणी

वृत्तसंस्था
मंगळवार, 9 मे 2017

पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुखपाल सिंह खारिया यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा वर्तविली असून सर्व पदावरून काढून टाकण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.

चंडीगड : पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रवक्ते सुखपाल सिंह खारिया यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करण्याची इच्छा वर्तविली असून सर्व पदावरून काढून टाकण्यात यावी अशी मागणी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.

खारिया हे पूर्वी कॉंग्रेसमध्ये होते. कॉंग्रेसमधून 'आप'मध्ये आल्यानंतर ते भोलाथ मतदारसंघातून निवडून आल्याने आमदार बनले आहेत. ते पंजाबमधील आम आदमी पक्षाचे प्रवक्तेही आहेत. मात्र पक्षाची पुनर्रचना केल्यानंतर कोणतेही पद न मिळाल्याने खारिया नाराज झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, 'मला पक्षाचा प्रवक्ता आणि विधानसभेतील पक्षाच्या व्हिप पदावरून तातडीने काढून टाकण्यात यावे अशी विनंती मी अरविंद केजरीवाल यांच्याकडे केली आहे.' पक्षातील अन्य काही नेते माझ्यापेक्षा 'अधिक पात्र' असल्याचे सांगत 'पक्षामध्ये एक सामान्य कार्यकर्ता आणि निवडून आलेला प्रतिनिधी म्हणून काम करण्यात मला आनंद वाटेल', असेही खारिया यांनी म्हटले आहे.

आम आदमी पक्षाच्या पंजाब विभागाची पुनर्रचना करण्यात आली आहे. संगरूरचे खासदार भगवंत मान यांची पक्षाच्या निमंत्रकपदी निवड करण्यात आली आहे.

Web Title: Punjab AAP Leader Asks Arvind Kejriwal To Remove Him From Posts