Punjab Election: काँग्रेस ‘तख्त’ राखणार का?

देशाच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पंजाब हे महत्वाचे राज्य ठरले आहे. एक बंडखोर राज्य अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे.
Congress
Congressesakal

पंजाबातील फिरोजपूरच्या उड्डाणपुलावर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा शेतकरी आंदोलकांनी अडविला आणि त्यांना तेथून दिल्लीला परतावे लागले. या घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेतील त्रुटीवरून केंद्र, पंजाब सरकार व देशभरात निर्माण झालेल्या वादाच्या गदारोळातच पंजाबबरोबरच पाच राज्याची निवडणूक जाहीर झाली. या वादाच्या पार्श्वभूमीवर पंजाबची निवडणूक आगामी प्रचारात राजकारणाच्याच नव्हे तर देशाचे भवितव्य ठरविण्याच्या दृष्टीनेही केंद्रस्थानी आली आहे. (Punjab Assembly Election Updates)

देशाच्या आजवरच्या राजकीय इतिहासात पंजाब हे महत्वाचे राज्य ठरले आहे.खलिस्तान या देशविरोधी चळवळीने हे राज्य जसे ओळखले जाते. तसेच देशाला कृषी क्रांतीत आघाडीवर राखण्यासाठीही योगदान देणारे राज्य म्हणूनही ओळखले जाते. येथील राजकीय सत्तेची मांड नेहमी अस्थिर राहिली. किमान चारपाच वेळा राष्ट्रपती राजवट या राज्याने अनुभवली. एक बंडखोर राज्य अशीच प्रतिमा निर्माण झाली आहे.

Congress
ओमिक्रॉन संसर्गाकडे दुर्लक्ष नको; जागतिक आरोग्य संघटनेचा इशारा

कॉँग्रेस व शिरोमणी अकाली दल या प्रमुख पक्षाचे राज्य अनेक वर्षे चालले. नंतर मात्र शिरोमणी अकाली दल (बादल गट) यांच्या सहकार्याने भाजपनेही सत्तेत सहभाग नोंदविला. नुकत्याच झालेल्या शेतकरी आंदोलनाचा केंद्रबिंदू पंजाब हा होता. जम्मू काश्मीरमधील ३७० वे कलम, आसाममधील नागरिकत्व कायदा, सरकारी सार्वजनिक संस्थांचे खासगीकरण आदी आघाड्यांवर मोदींचा उधळलेला वारू देशातील शेतकरी संघटनांनी व विशेषतः पंजाबातील संघटनांनी रोखला होता.

देशातील प्रमुख पक्ष व सध्या सत्ताधारी असलेल्या कॉँग्रेसला पंजाबात गटबाजीने पोखरले आहे. माजी मुख्यमंत्री कॅ.अमरिंदरसिंग व प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांच्या वादात पक्षश्रेष्ठींनी सिद्धू यांच्या बाजूने कौल दिल्याने अमरिंदरसिंगानी पक्षाचा राजीनामा देऊन पंजाब लोक कॉँग्रेस हा पक्ष स्थापन केला. त्यांनी भाजपला साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. या घडामोडींनतरही कॉँग्रेस पक्षात सर्व काही आलबेल नाही. पक्षश्रेष्ठींनी अमरिंदरसिंगांना झटका देताना सिध्दू यांनाही चकवून मुख्यमंत्रिपदी चरणसिंग चन्नी यांची निवड केली होती. मुख्यमंत्री चन्नी व सिद्धू यांच्यातही फारसे पटत नाही. शिवाय पक्षश्रेष्ठी अनेक निर्णय दिल्लीतून घेत आहेत. या सर्व अडथळ्यांना पार करून कॉँग्रेसला व राहूल गांधींना पंजाबचे तख्त राखण्याचे आव्हान आहे. आणि ती वाटते तितके नक्कीच सोपे नाही.

Congress
वाजपेयींच्या स्वप्नातली NDA राहिली नाही; अकाली दलाने 22 वर्षांची सोडली साथ

नवे मुख्यमंत्री चन्नी यांनी आपण नाईट वॉचमन नाही, असे दर्शविण्याचा प्रयत्न चालविला आहे. तर तिकडे सिध्दू यांची नजर हुकलेल्या मुख्यमंत्रिपदावर आहे. केंद्रातील बलाढ्य अशा भाजपला देशभर यश मिळत असले तरी पंजाबातील त्यांची वाटचालही नक्कीच सुकर नाही. एकतर शेतकरी कायद्याच्या मुद्द्यावरून त्यांची साथ त्यांचा पंधरा वर्षांपासूनचा सहकारी पक्ष शिरोमणी अकाली दलाने सोडली आहे. त्यामुळे त्यांनी अमरिंदरसिंग व सुखदेवसिंग ढिंढसा यांच्या अकाली दलाची साथ घेतली आहे. तर दिल्लीतील आम आदमी पक्षानेही पंजाबवर आपले लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्यावेळी चांगली मते या पक्षाने येथे मिळविली आहेत. या सर्व पक्षांच्या गदारोळात पंजाबातील शेतकरी संघटनांनी संयुक्त समाज मोर्चा या नावाने निवडणुका लढविण्याची घोषणा केली आहे. या निर्णयाने ग्रामीण पंजाबातील मतांत मोठी फूट होण्याची शक्यता असून सत्ताधारी कॉँग्रेस व अकाली दलाला त्याचा फटका बसण्याची शक्यता आहे. त्यातही फिरोजपूरची घटनेनंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा मुद्दा भाजप तापवत नेणार असल्याने पंजाबची निवडणूक देशभरातील प्रचारसभांत गाजणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com