भाजप नेत्याकडून मुख्यमंत्री मान यांना लग्नाचं अनोखं गिफ्ट

Tajinder Bagga Gift to CM Mann
Tajinder Bagga Gift to CM Mann esakal
Summary

पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे.

Tajinder Bagga Gift to CM Mann : पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान (Bhagwant Mann) आणि डॉ. गुरप्रीत कौर यांचा विवाह अखेर पार पडला आहे. काल दुपारी बाराच्या सुमारास दोघंही लग्नबंधनात अडकले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल (Arvind Kejriwal) कुटुंबासह या लग्नाला हजर होते. त्यांनी लग्नात वडिलांचे विधी पार पाडले. लग्नात मर्यादित पाहुणे बोलावण्यात आले होते.

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानीच लग्नाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. 32 वर्षीय गुरप्रीत कौर (Gurpreet Kaur) या भगवंत मान (वय 48) यांच्यापेक्षा 16 वर्षांनी लहान आहेत. सुमारे चार वर्षांपूर्वी दोघांची भेट झाली. भगवंत मान यांचे हे दुसरे लग्न आहे. 2015 मध्ये त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला होता. डॉ. गुरप्रीत कौर यांचे कुटुंब सध्या पंजाबमध्ये राहत असले तरी तिचे वडिलोपार्जित निवासस्थान हरियाणातील कुरुक्षेत्र इथं आहे.

Tajinder Bagga Gift to CM Mann
यशवंत सिन्हांना शुभेच्छा द्यायला गेला आणि दीड लाखांचा पेन हरवून बसला!

दरम्यान, भाजप नेते तेजिंदर सिंह बग्गा (BJP leader Tajinder Singh Bagga) यांनी मुख्यमंत्री भगवंत मान त्यांच्या लग्नाला अनोख्या शुभेच्छा दिल्या आहेत. बग्गा यांनी ट्विटरवर 568 रुपयांच्या ऑर्डरचा स्क्रीनशॉट शेअर केलाय. जो त्यांनी भगवंत मान यांना ऑनलाइन पाठवला. तेजिंदर पाल सिंह बग्गा यांनी सांगितलं की, भगवंत मान यांच्या लग्नासाठी मी फुलांचा गुच्छ मागवला होता. भगवंत मानजींना त्यांच्या लग्नाच्या शुभेच्छा आणि फुलं पाठवली आहेत, असं त्यांनी ट्विटव्दारे नमूद केलंय. भाजपचे तेजिंदर बग्गा हे ट्विटरवर खूप सक्रिय असतात. त्यांनी भगवंत मान यांना कॉमेडियन मुख्यमंत्री असंही संबोधलं होतं.

Tajinder Bagga Gift to CM Mann
बुलेट ट्रेन प्रकल्पाचे प्रभारी सतीश अग्निहोत्रींची रेल्वेकडून हकालपट्टी

डॉ. गुरप्रीत कौर कोण आहेत?

अनेक दशकांपूर्वी गुरप्रीत कौरचे आजोबा हरियाणामध्ये आले होते. गुरप्रीत कौर तीन बहिणींमध्ये सगळ्यात लहान आहेत. त्यांची मोठी बहीण अमेरिकेत आहे आणि त्यांची दुसरी बहीण ऑस्ट्रेलियात आहे. दोघीही उच्चशिक्षित आहेत. गुरप्रीत कौर उच्चशिक्षित आहेत. त्या व्यवसायानं डॉक्टर आहेत. त्यांनी अंबाला स्थित महर्षी मार्कंडेयश्वर इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस आणि रिसर्चमधून MBBS केलं आहे. तिथंही त्या कायम टॉपर होत्या. "त्या अतिशय हुशार आहेत आणि त्यांनी सुवर्णपदक मिळवलं आहे," असं गुरिंदरजित सिंग सांगतात.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com