
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काँग्रेस खासदाराची एक मौल्यवान वस्तू हरवलीय.
यशवंत सिन्हांना शुभेच्छा द्यायला गेला आणि दीड लाखांचा पेन हरवून बसला!
विरोधी पक्षातील राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा (Yashwant Sinha) यांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या काँग्रेस खासदाराची (Congress MP) एक मौल्यवान वस्तू हरवलीय. या वस्तुची किंमत तब्बल 1.50 लाख इतकी आहे. दरम्यान, काँग्रेस खासदारानं याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केलीय.
कन्याकुमारीतील काँग्रेस खासदार विजय वसंत (MP Vijay Vasanth) हे चेन्नईतील (Chennai) एका कार्यक्रमात सहभागी झाले होते. यादरम्यान, त्यांचा तब्बल 1.50 लाख रुपये किमतीचा पेन हरवलाय. याबाबतची तक्रार त्यांनी पोलिसांकडं केलीय. कार्यक्रमात यशवंत सिन्हा यांनी तामिळमधील द्रमुक आघाडीच्या आमदार आणि खासदारांची भेट घेतली होती.
हेही वाचा: PM मोदींनी 'अक्षय पात्र किचन'चं केलं उद्घाटन; एक लाख मुलांसाठी बनवता येणार अन्न
मंगळवारी (5 जुलै 2022) गिंडी पोलिसात (Gindi Police) दाखल केलेल्या तक्रारीत विजय वसंत यांनी हरवलेला पेन माँटब्लँक फाउंटन पेन (Montblanc Fountain Pen) असल्याचं नमूद केलंय. त्यांचे दिवंगत वडील आणि कन्याकुमारीचे माजी खासदार एच. वसंतकुमार यांच्याकडून मिळालेल्या 1.50 लाख रुपयांच्या पेनला ते अनमोल मानतात.
हेही वाचा: 5 कोटींसाठी चंद्रशेखर गुरुजींचा खून; तपासातून धक्कादायक माहिती समोर
रीतसर पोलिस तक्रार दाखल झाल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासता येईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलंय. अभिनेते-राजकारणी विजयकुमार उर्फ विजय वसंत यांनी सांगितलं की, हा पेन माझ्यासाठी खूप खास होता, म्हणून मी पोलिस ठाण्यामध्ये याबाबतची तक्रार दाखल केलीय. गिंडीतील हॉटेल गर्दीनं फुल्ल भरलं होतं. यादरम्यान हॉटेलमध्ये गेल्यावर माझ्या खिशात पेन होता. पण, जेव्हा मी बाहेर पडलो, त्यावेळी माझ्या खिशात पेन नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. खासदारानं तत्काळ हॉटेल अधिकाऱ्यांकडं याबाबतची तक्रार केली. विजय वसंत म्हणाले, "अप्पा हा पेन वापरायचे. त्यांच्या मृत्यूनंतर मीच हा पेन वापरतोय. त्यामुळं माझ्यासाठी हा पेन खूप खास आहे. या पेनाचा मी जवळ-जवळ दोन वर्षे झाली वापर करतोय."
Web Title: Tamil Nadu Congress Mp Vijay Vasanth Rs 1 50 Lakh Pen Lost Yashwant Sinhas Event Chennai
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..