घातपाती कारवाया केल्यास चोख उत्तर; कॅ. अमरिंदरसिंग यांचा पाकिस्तानला इशारा

घातपाती कारवाया केल्यास चोख उत्तर; कॅ. अमरिंदरसिंग यांचा पाकिस्तानला इशारा

गुरुदासपूर : पाकिस्तानचे लष्करप्रमुख कमर जावेद बाजवा यांच्यावर आज पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांनी चांगलेच तोंडसुख घेतले. पंजाबमधील दहशतवादी कारवाया आणि सीमेलगत जवानांच्या हत्येप्रकरणी बाजवा जबाबदार असल्याचे सांगत घातपाती कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर दिले जाईल, असा इशारा दिला.

कर्तारपूर साहिब कॉरिडॉरच्या भूमिपूजननिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी उपरराष्ट्रपती वेंकया नायडू यांची प्रमुख उपस्थिती होती. पंतप्रधान इम्रान खान यांचे आभार मानत असतानाच अमरिंदर सिंग यांनी बाजवा यांना इशारा दिला. ते म्हणाले की, मीसुद्धा लष्करी सेवा बजावली आहे. पाकिस्तानचे चीफ ऑफ आर्मी स्टाफ असणारे बाजवा हे माझ्यापेक्षा सेवेने खूप मागे आहेत. मी तर जनरल परवेज मुशर्रफपेक्षा वरिष्ठ आहे. ते 1964 च्या तुकडीतील आहेत, तर मी 1963 च्या तुकडीतील जवान आहे.

पुढे ते म्हणाले की, याठिकाणी वरिष्ठ-कनिष्ठची चर्चा करत नाही, तर प्रत्येक जवानाला ठाऊक असते की, दुसरा जवान काय विचार करत आहे. आपल्याला पाकिस्तानच्या सीमेवरून भारतीय जवानांवर गोळ्या झाडण्याची शिकवण मिळाली आहे काय? अमृतसर येथे सकाळी कीर्तन करणाऱ्यांवर ग्रेनेड फेकण्यात येते, पठाणकोट आणि दीनानगर येथे घुसखोरी करून नागरिक आणि जवानांना मारण्यात येते. ही लष्कराची शिकवण नाही, तर पळपुटेपणाचे लक्षण आहे. हा भित्रेपणा आहे आणि या गोष्टीची मला खंत वाटते. पंजाबमध्ये घातपाती कारवाया घडवून आणण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर देऊ, हे बाजवांनी लक्षात ठेवावे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com