पंजाबवर दिल्लीचे लोक राज्य कसं करू शकतात? चन्नी यांचा केजरीवालांवर पलटवार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arvind Kejriwal-CM Channi

पंजाबवर दिल्लीचे लोक राज्य कसं करू शकतात? चन्नी यांचा केजरीवालांवर पलटवार

नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi CM Arvind Kejriwal) आणि पंजाबचे मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी (Punjab CM Channi) यांची एकमेकांवर टीका-टिप्पणी सुरू आहे. चन्नी हे बनावट केजरीवाल आहेत, असं केजरीवाल म्हणाले होते. त्यानंतर आता चन्नी यांनी पलटवार केला आहे.

हेही वाचा: सत्ता दिल्यास प्रत्येक महिलेला महिन्याकाठी हजार रुपये: केजरीवाल

''पंजाबमध्ये बनावट केजरीवाल फिरत आहेत. मी इथे जे काही वचन देतो, तेच ते पुन्हा सांगतात. संपूर्ण देशात केजरीवाल एकच माणूस आहे जो तुमचे वीज बिल शून्यावर आणू शकतो. तेव्हा त्या खोट्या केजरीवालांपासून सावध राहा, असं अरविंद केजरीवाल म्हणाले. त्यानंतर आता चन्नी यांनी त्यांना उत्तर दिले आहे. खरा आम आदमी कोण आहे? हे दाखवून देण्याचा प्रयत्न चन्नी यांनी केला आहे.

''केजरीवाल आज कोणते मिशन पंजाबमध्ये सुरू करत आहेत? पंजाब अनाथ आहे का? पंजाबची काळजी घेण्यासाठी पंजाबी येथे आहेत. काही बाहेरचे लोक दिल्लीतून येऊन पंजाबवर राज्य कसे करू शकतात? ते इथे फक्त पंजाबींना फसवण्यासाठी आला आहे” असं चन्नी म्हणाले.

काही दिवसांपूर्वी चन्नी यांनी केजरीवाल यांच्या कपड्यांवर टीका केल्यानंतर या दोघांमध्ये वाद सुरू झाला. केजरीवाल यांना सर्वाधिक पगार मिळत असताना ते स्वतःसाठी चांगले कपडे का शिवून घेत नाहीत, असा सवाल चन्नी यांनी उपस्थित केला होता. त्यालाच केजरीवाल यांनी उत्तर दिले होते. ''तुम्हाला माझे कपडे आवडत नसतील तर ठीक आहे. पण, लोकांना ते आवडतात. कपडे सोडा, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जनतेला दिलेली आश्वासने कधी पूर्ण करणार ते सांगा?'' असं केजरीवाल म्हणाले होते.

loading image
go to top