Punjab DIG Arrest by CBI : मोठी बातमी! पंजाबच्या 'DIG'ना पाच लाखांची लाच घेताना ‘CBI’ने रंगेहाथ पकडलं

Punjab DIG Harcharan Singh Bhullar Bribery Case : या मोठ्या अटकेनंतर पंजाब पोलिस दलात खळबळ माजली आहे ; सीबीआयकडे अनेक दिवसांपासून येत होत्या तक्रारी
CBI officers arrest Punjab DIG Harcharan Singh Bhullar after he was caught red-handed accepting a ₹5 lakh bribe — a major breakthrough in the state’s anti-corruption drive.

CBI officers arrest Punjab DIG Harcharan Singh Bhullar after he was caught red-handed accepting a ₹5 lakh bribe — a major breakthrough in the state’s anti-corruption drive.

esakal

Updated on

CBI Arrests Punjab DIG Harcharan Singh Bhullar in Bribery Case : पंजाबमध्ये रोपड रेंजचे डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांना सीबीआयने गुरुवारी दुपारी अटक केली आहे. ही अटक एका हायप्रोफाइल लाचखोरीच्या प्रकरणाशी जुडलेल्या असल्याचे सांगितले जात आहे. प्राप्त माहितीनुसार मंडी गोविंदगढच्या एका भंगार व्यापाऱ्याने डीआयजींवर पाच लाख रुपयांची लाच घेतल्याचा आरोप केला होता. पोलिसांकडून अद्यापपर्यंत याबाबत कोणतेही अधिकृत निवेदन जारी केले गेलेले नाही.

सीबीआयच्या सूत्रांच्या माहितीनुसार, डीआयजींना लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. फतेहगढ साहिब येथील रहिवाशी तक्रारदाराने आरोप केला होता की, डीआयची भुल्लर यांनी एका प्रकरणाचा निपटारा करण्यासाठी मोठ्या रकमेची मागणी केली होती.

यानंतर या रकमेतील पहिला हप्ता देण्यासाठी संबंधित व्यक्तीस मोहाली कार्यालयात बोलावले होते. या माहितीच्या आधारे सीबीआयच्या टीमने छापेमारी केली आणि घटनास्थळीच डीआयजींना अटक केली.

CBI officers arrest Punjab DIG Harcharan Singh Bhullar after he was caught red-handed accepting a ₹5 lakh bribe — a major breakthrough in the state’s anti-corruption drive.
Gujarat BJP Ministers Resign : मोदींच्या गुजरातमध्ये मोठी राजकीय घडामोड! मुख्यमंत्री सोडून भाजपच्या सर्व मंत्र्यांनी दिला राजीनामा

विशेष म्हणजे सीबीआयला या वरिष्ठ अधिकाऱ्याविरोधात प्रदीर्घ काळापासून तक्रारी मिळत होत्या. ते विविध प्रकरणांमधून दिलासा मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करत होते. याच माहितीच्या आधारावर सीबीआयने जाळं टाकलं आणि योजनेनुसार ट्रॅप ऑपरेशन रावबलं.

प्राप्त माहितीनुसार, जशी डीआयजींनी पाच लाखांची रक्कम हातात घेतली, त्याच क्षणी सीबीआयच्या टीमने धाव घेत त्यांना रंगेहाथ अटक केली. झाडाझडीत पैशांचे बंडल जप्त केले गेरल्याचीही माहिती समोर आली आहे.

CBI officers arrest Punjab DIG Harcharan Singh Bhullar after he was caught red-handed accepting a ₹5 lakh bribe — a major breakthrough in the state’s anti-corruption drive.
Jawed Habib FIR News : सेलिब्रिटी हेअरस्टायलिस्ट जावेद हबीब विरुद्ध तब्बल ३२ 'FIR' दाखल!

विशेष म्हणजे या अटकेच्या कारवाईनंतर डीआयजींच्या अन्य कार्यालय आणि घरी देखील सीबीआयकडून छापेमारी केली गेली. तपासकर्त्यांना संशय आहे की, या ठिकाणांहून भ्रष्टाचारातून कमावलेल्या संपत्तीची कागदपत्रे मिळू शकतात. सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने माहिती दिली की, आरोपीविरोधात भ्रष्टाचार निवारण अधिनियम अंतर्गत प्रकरणाची नोंदी करून घेण्यात आली आहे आणि सध्या त्यांची चौकशी सुरू आहे, दरम्यान या मोठ्या अटकेनंतर पंजाब पोलिस दलात खळबळ माजली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com