पंजाबमध्ये काँग्रेसमुळे 'आप'चे स्वप्न भंगले... 

टीम ई सकाळ
शनिवार, 11 मार्च 2017

कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने पंजाब राज्यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करत 117 जागांपैकी तब्बल 72 जागांवर आघाडी घेतली आहे.

अकाली दल व भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) युतीस अवघ्या 18 जागा मिळाल्या आहेत; तर राष्ट्रीय नेता बनण्याची महत्त्वाकांक्षा असलेल्या अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षास (आप) अखेर 27 जागांवर समाधान मानावे लागले आहे.

'आप'ची पंजाबमधील कामगिरी प्रत्यक्षदर्शनी समाधानकारक असली; तरी काँग्रेसच्या नेत्रदीपक कामगिरीमुळे 'आप'ची ही कामगिरी झोकाळून गेली आहे. 

दिल्लीमध्ये बहुमत मिळाल्यानंतर पंजाबमध्ये आपच्या कामगिरीविषयी अत्यंत उत्सुकता निर्माण झाली होती. दिल्लीमधील विजय हा भ्रष्टाचारविरोधी मोहिमेचा विजय असल्याचे पक्ष समर्थकांकडून उच्चरवाने सांगण्यात आले होते.

पंजाबमध्येही अकाली दल व भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराचा मुद्दा मोठ्या प्रमाणात गाजला होता. या पार्श्‍वभूमीवर, राज्यामध्ये आपकडून मोठ्या प्रमाणावर मोर्चेबांधणी करण्यात आली होती.

तसेच पंजाबमधील विजय हा एक राष्ट्रीय पक्ष बनण्याच्या 'आप'च्या प्रयत्नांसही मोठा आधार झाला असता. तेव्हा पंजाबसहीत गोव्यामध्येही 'आप'चेच सरकार येईल, असा दावा आप नेते मनीष सिसोदिया यांनी केला होता. मात्र काँग्रेसच्या पंजाबमधील प्रभावी कामगिरीमुळे हे स्वप्न उध्वस्त झाले आहे.

Web Title: Punjab Election Congress AAP Arvind Kejriwal