पंजाब सरकारचे धडाधड निर्णय; आता 424 व्हीआयपींची 'सुरक्षा' घेतली काढून

Bhagwant Mann
Bhagwant Mann esakal
Summary

पंजाब सरकारनं आज 424 व्हीआयपींची सुरक्षा काढून घेतलीय.

चंदीगड : पंजाब सरकारनं (Punjab Government) आज 424 व्हीआयपींची सुरक्षा (VIP Security) काढून घेतलीय. यामध्ये डेरा प्रमुखासह अनेक निवृत्त अधिकारी आणि माजी आमदारांचा समावेश आहे. ज्यांची सुरक्षा काढून घेतलीय, यात अकाल तख्तचे जथेदार ज्ञानी हरप्रीत सिंह, गायक सिध्दू मुसेवाला (Singer Sidhu Moose Wala), ज्येष्ठ एसएडी नेते चरणजीत सिंह ढिल्लो यांचा समावेश आहे. सुरक्षा मागं घेण्यापूर्वी सरकारनं आढावा बैठक घेतली होती. यामध्ये 424 लोकांना सुरक्षेची गरज आहे का? यावर चर्चा झाली. त्यानंतर राज्य सरकारनं सुरक्षा कमी करण्याचे आदेश जारी केले आहेत. सुरक्षा मागं घेण्याचं आणखी एक कारण म्हणजे, पंजाब पोलिसमध्ये आधीच कर्मचाऱ्यांची कमतरता आहे आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सामान्य ठिकाणी सुरक्षा कर्मचाऱ्यांची कमतरता पूर्ण करणं कठीण होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आलाय.

आदेशानुसार, ज्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना सुरक्षेतून काढून टाकण्यात आलंय. त्यांना आज त्यांच्या बटालियनमध्ये जावं लागणार आहे. याआधीही एप्रिल महिन्यात सरकारनं 184 जणांची व्हीआयपी सुरक्षा काढून घेतली होती. यात माजी मुख्यमंत्री, माजी मंत्र्यांसह अनेक आमदारांचा समावेश होता. ज्यांना पंजाब सरकारनं खासगी सुरक्षा दिली होती. या नेत्यांसोबत 200 हून अधिक पोलीस तैनात होते.

Bhagwant Mann
भाजप बहुमताच्या एकदम जवळ; कर्नाटक विधान परिषदेवर 7 उमेदवारांची बिनविरोध निवड

त्यामध्ये अकाल तख्तचे माजी जथेदार, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Captain Amarinder Singh), गुरदर्शन बराड, आयपीएस गुरदर्शन सिंह, उदयबीर सिंग (माजी कॅबिनेट मंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांचा मुलगा) आणि माजी मुख्यमंत्री चरणजितसिंह चन्नी (Charanjit Singh Channi) व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनाही स्थान मिळालं होतं. यासोबतच पंजाब सरकारनं माजी कॅबिनेट मंत्री सुरजित सिंग रखडा, बीबी जागीर कौर, तोता सिंग (शिरोमणी अकाली दल मोगा), माजी काँग्रेस खासदार वरिंदर सिंग बाजवा, संतोष चौधरी आणि काँग्रेसचे माजी आमदार दीप मल्होत्रा ​​यांची सुरक्षा काढून घेण्याचे आदेश दिले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com