ट्रॅक्टर रॅली : अटक केलेल्या 83 शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाखांची मदत I Punjab | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tractor Rally Punjab

ट्रॅक्टर रॅली काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 83 जणांना नुकसानभरपाई देण्याचा सरकारनं निर्णय घेतला आहे.

अटक केलेल्या 83 शेतकऱ्यांना सरकार देणार 2 लाखांची मदत

पंजाब : या वर्षी 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारानंतर अटक करण्यात आलेल्या 83 शेतकऱ्यांना पंजाब सरकारनं आर्थिक मदत जाहीर केलीय. मुख्यमंत्री चरणजित सिंह चन्नी (Cm Charanjit Singh Channi) यांनी प्रत्येक शेतकऱ्याला दोन लाख रुपये देण्याची घोषणा केलीय.

जेव्हा 26 जानेवारी रोजी संयुक्त किसान मोर्चानं दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढली. त्याच दिवशी काही शेतकऱ्यांनी लाल किल्ल्यावर पोहोचून तिथं केसरी ध्वज फडकवला होता. CM चन्नी म्हणाले, 'केंद्रीय कृषी सुधारणा कायद्यांविरोधात सरकार शेतकऱ्यांच्या आंदोलनासोबत आहे. त्याच अनुषंगानं हे पाऊल उचलण्यात आलंय. चरणजीत सिंह चन्नी यांनी ट्विट केलंय, की 'तीन काळ्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांच्या आंदोलनाला माझ्या सरकारचा पाठिंबा असून 26 जानेवारी 2021 रोजी दिल्लीत ट्रॅक्टर रॅली काढल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 83 जणांना आम्ही नुकसानभरपाई देण्याचाही निर्णय घेतलाय, असं त्यांनी नमूद केलंय.

हेही वाचा: आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात..

दरम्यान, पंजाबमध्ये लवकरच विधानसभा निवडणुका होणार आहेत. काँग्रेस सरकारच्या या खेळीमुळं नवं राजकीय युद्ध सुरू होऊ शकतं. सरकारनं हा कायदा आधीच रद्द केलाय. यातील महत्त्वाची बाब म्हणजे, लाल किल्ल्यावर हिंसाचाराचे प्रकरण घडले, तेव्हा संयुक्त किसान मोर्चानं त्यांच्यावरील आरोप फेटाळले होते. कारण, मोर्चाच्या ट्रॅक्टर रॅलीचा कार्यक्रम लाल किल्ल्याकडे नव्हता. याप्रकरणी त्यांनी पंजाबी अभिनेता दीप सिध्दूला जबाबदार धरलं होतं. यापूर्वी पंजाब विधानसभेच्या विशेष अधिवेशनात काँग्रेस सरकारनं केंद्राचे तीनही कृषी कायदे रद्द केले होते.

loading image
go to top