आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात झाले 'करोडपती' | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

People's Postcode Lottery

ब्रिटनमधील एका आईला जेव्हा समजलं, की ती आणि तिचा मुलगा दोघांनीही लॉटरी जिंकलीय, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही.

आईनं पहिल्यांदाच खरेदी केलं लॉटरीचं तिकीट अन् माय-लेकरं रातोरात..

sakal_logo
By
टीम ई-सकाळ

ब्रिटन : ब्रिटनमधील (Britain) एका आईला जेव्हा समजलं, की ती आणि तिचा मुलगा दोघांनीही लॉटरी जिंकलीय, तेव्हा तिच्या आनंदाला पारावार उरला नाही. या आई आणि मुलाच्या जोडीला प्रत्येकी 30-30 लाख रुपयांची लॉटरी लागलीय. विशेष म्हणजे, आईनं यापूर्वी कधीही लॉटरीचं तिकीट खरेदी केलं नव्हतं. तिनं आपल्या मुलाच्या सांगण्यावरून पहिल्यांदाच तिकीट घेतलं आणि ती रातोरात लाखोंची मालकिन बनलीय.

'मिरर यूके'च्या वृत्तानुसार, मर्सिसाइड येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय कॅथलीन मिलरनं (Kathleen Miller) तिचा 35 वर्षीय मुलगा पॉलच्या (Paul) सांगण्यावरून, पीपल्स पोस्टकोड लॉटरीचं (People's Postcode Lottery) तिकीट खरेदी केलं होतं. लकी ड्रॉ बाहेर आल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या दोघांना 30,000 पौंडची (29 लाख 89 हजार रुपये) लॉटरी लागलीय.

हेही वाचा: भरपावसात महिला पोलीस निरीक्षकानं बेशुद्ध व्यक्तीला खांद्यावर उचलून नेलं रुग्णालयात

कॅथलीन आणि तिचा मुलगा पॉल या दोघांना प्रत्येकी 30-30 लाखांची लॉटरी लागलीय. लॉटरी जिंकल्यानंतर कॅथलीन म्हणाली, माझा मुलगा पीपल्स पोस्टकोड लॉटरी खेळायचा. एके दिवशी त्यानं मला तिकीट घेण्यास प्रोत्साहन केलं. मी अनौपचारिकपणे तिकीट काढले. पण, मला अजिबात खात्री नव्हती की आम्ही दोघंही ही लॉटरी जिंकू शकेन, असं त्यांनी नमूद केलं. पीपल्स पोस्टकोड लॉटरी अॅम्बेसेडर मॅट जॉन्सन यांनी कॅथलीनची भेट घेऊन त्यांना लॉटरीचा चेक दिलाय. जॉन्सन म्हणाले, हे बक्षीस पीपल्स पोस्टकोड लॉटरीच्या विशेष ख्रिसमस मोहिमेचा भाग आहे. ज्यात लकी ड्रॉ दरम्यान 30 लाख रुपये प्रति तिकीट विजेत्याचं नाव काढण्यात आलंय.

हेही वाचा: भारतीय वंशाच्या चार मुलांना रस्त्यात सोडून हल्लेखोरांचं पलायन

loading image
go to top