Punjab : तुरुंगात २०० कैद्यांकडून पोलिसांवर हल्ला, एसपींचं डोकं फोडलं; इतर अधिकारी पळून गेल्यानं वाचला जीव

Ludhiana Jail पंजाबमधील एका तुरुंगात २०० कैद्यांकडून पोलिसांवर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याच्या घटनेमुळं खळबळ उडाली आहे. कैद्यांच्या हल्ल्यात पोलीस अधीक्षक गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
Massive Clash in Ludhiana Jail Prisoners Assault Police Officers

Massive Clash in Ludhiana Jail Prisoners Assault Police Officers

Esakal

Updated on

पंजाबच्या लुधियानातील मध्यवर्ती कारागृहात मंगळवारी सायंकाळी कैद्यांच्या दोन गटात हिंसक झटापट झाली. तुरुंग प्रशासन आणि पोलिसांनी त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला असता कैद्यांनी पोलीस अधिकाऱ्यांवरच हल्ला केला. तुरुंग अधीक्षक कुलवंत सिद्धू यांच्या डोक्यात विटांनी मारहाण करण्यात आली. एसपी कुलवंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवळपास अडीचशे कैद्यांकडून पोलिसांवर हल्ला करण्यात आला. या घटनेनं खळबळ उडाली असून तुरुंगात मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com