नवज्योतसिंग सिद्धू भाजपला बोलले 'GTU'

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

नवी दिल्लीः देशात नवी पहाट होत असून, गिरे तो भी टांग ऊपर (GTU) अशी भारतीय जनता पक्षाची अवस्था आहे, असे पंजाबमधील मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

काँग्रेसने आघाडी घेतल्यानंतर नवज्योतसिंग सिद्धू यांनी भाजपला टोला लगावताना म्हटले आहे की, 'राहुल भाई पहले से ही सबको साथ लेकर चलते हैं और भाजप का नाम है गिरे तो भी टांग ऊपर (GTU)'

चार वर्षांपूर्वी चौफेर उधळलेल्या भाजपच्या विजयरथाला आज (मंगळवार) धक्का बसला. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीनही राज्यांमध्ये भाजपच्या सत्तेला काँग्रेसने जोरदार धक्का दिला आहे. मध्य प्रदेशमध्ये दोन्ही पक्षांमध्ये पारडे समान आहे, तर राजस्थानमध्ये काँग्रेसने आघाडी घेतली आहे. छत्तीसगडमध्ये काँग्रेसने पूर्ण वर्चस्व राखत भाजपची सत्ता हिसकावून घेतली.

दरम्यान, नवज्योसिंग सिद्धू यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर भाजपवर टीका करणे सुरू केले आहे. राहुल गांधी हे सर्वसामान्य नागरिकांचे नेते असून, ते सर्वांना सोबत घेऊन चालत आहेत, असेही नवज्योसिंग सिद्धू यांनी म्हटले आहे.

Web Title: punjab minister navjotsingh sidhu criticize bjp after assembly election result