Punjab Gram Panchayat Love Marriage Ban : पंजाबच्या मोहाली जिल्ह्यातील मानकपूर शरीफ गावात ग्रामपंचायतीने एक वादग्रस्त ठराव मंजूर करत कुटुंब किंवा समुदायाच्या परवानगीशिवाय प्रेमविवाह करण्यास बंदी घातली आहे. ३१ जुलै रोजी एकमताने मंजूर झालेल्या या ठरावात अशा जोडप्यांना गावात राहण्याची किंवा आसपासच्या भागात स्थायिक होण्याची परवानगी दिली जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय केवळ १० किलोमीटर अंतरावर असलेल्या चंदीगडजवळ घेतल्याने यावर राजकीय नेते आणि मानवाधिकार कार्यकर्त्यांकडून जोरदार प्रतिक्रिया उमटत आहेत.