

Tipper truck driver wins Rs 12 crore lottery.
Sakal
मोहाली (पंजाब): नशीब कधी आणि कोणाचे दार ठोठावेल हे सांगता येत नाही. पंजाबमधील मोहाली जिल्ह्यातील एका सामान्य टिपर ट्रक चालकासोबत असेच काहीसे घडले आहे. तब्बल १५ वर्षांपासून कुटुंबीयांपासून लपवून दर दिवाळीला लॉटरीचे तिकीट खरेदी करणाऱ्या बलजिंदर सिंग (वय ४५) यांना अखेर 'पंजाब स्टेट डिअर दिवाळी बंपर २०२६' लॉटरीचे १२ कोटी रुपयांचे पहिले बक्षीस लागले आहे.