पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक, पंजाब पोलिसांनी दाखल केला गुन्हा

PM Modi Security
PM Modi Securitye sakal

नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी पंजाब दौऱ्यावर (PM Modi Punjab Rally) जात असताना त्यांच्या सुरक्षेत गंभीर चूक असल्याचं (PM Modi Security Breach) गृहमंत्रालयानं म्हटलं होतं. मोदींचा ताफा एका उड्डाण पुलावर १५-२० मिनिटं अडकून पडला होता. आता याच प्रकरणी पंजाब पोलिसांनी (Punjab Police) गुन्हा दाखल केला आहे. तसेच या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.

PM Modi Security
PM मोदी पुलावर अडकल्यानंतर नड्डांची काँग्रेसवर आगपाखड

''पंतप्रधान मोदींची पंजाबमध्ये फिरोजपूर येथे सभा होती. त्यासाठी मोदी भटींडामध्ये उतरले होते. त्यानंतर ते हुसैनीवालामध्ये राष्ट्रीय शहीद स्मारकाला हेलिकॉप्टरने जाणार होते. पण, पंजाबमध्ये पावसाचं वातावरण होतं. २० मिनिटे वाट पाहून देखील वातावरण ठीक झालं नाही. त्यामुळे त्यांनी रस्त्यानं जाण्याचं ठरलं. पंजाब पोलिसांनी सुरक्षेची हमी दिल्यानंतर मोदींचा ताफा रवाना झाला. पण, मध्येच आंदोलकांनी रस्ता अडवल्यामुळे त्यांचा ताफा अडकून पडला होता. पंतप्रधानांच्या सुरक्षेती गंभीर चूक होती'', असं केंद्रीय गृहमंत्रालयाच्या वतीने जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हटलं आहे.

दरम्यान, मी जीवंत पोहोचू शकलो, तुमच्या मुख्यमंत्र्यांना धन्यवाद सांगा, असं मोदी यांनी म्हटल्याची माहिती होती. त्यानंतर पंजाबचे मुख्यमंत्री चन्नी यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले होते. मोदींनी शेवटच्या क्षणाला कार्यक्रमस्थळी जाण्याचा मार्ग बदलला. त्यामुळे असं घडलं असावं. पण, खरंच पंतप्रधानांच्या सुरक्षेत चूक झाली असेल तर त्याची आम्ही चौकशी करू, असं पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी म्हणाले होते.

पंजाब सरकारने केली उच्चस्तरीय समितीची स्थापना -

पंतप्रधानांच्या सुरक्षेत गंभीर चूक झाल्याच्या गृहमंत्रालयाच्या आरोपानंतर पंजाब सरकारने उच्चस्तरीय समितीची स्थापना केली आहे. या समितीमध्ये निवृत्त न्यायमूर्तींचा समावेश असून या घटनेची सखोल चौकशी केला जाणार आहे. ही समिती तीन दिवसांत अहवाल सादर करणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com