लसीकरण पूर्ण करणाऱ्या गावांना हे राज्य देणार १० लाख निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amrinder Singh

लसीकरण पूर्ण करणाऱ्या गावांना हे राज्य देणार १० लाख निधी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

चंडीगड - शंभर टक्के लसीकरण (Vaccination) करणाऱ्या गावांना दहा लाख रुपयांचा विशेष विकास निधी (Special Development Fund) देण्याची घोषणा पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग (Amrinder Singh) यांनी केली. (Punjab State Provide Rupees 10 lakh Villages Completed Vaccination)

अमरिंदर यांनी काल पंचायत समित्यांच्या प्रतिनिधींशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. लस घेण्याविषयीची द्विधावस्था संपावी असा यामागील उद्देश असल्याचे सांगून ते म्हणाले की, सरपंच आणि पंच मंडळींनी गावाच्या कोरोनाविरोधी लढ्यात पुढाकार घ्यावा आणि राज्य शासनाच्या कोरोना मुक्त पींड अभियानला चालना द्यावी. सौम्य लक्षणे असले तरी लोकांना चाचणीसाठी पुढे यायला लावावे.

आजघडीला पंजाबमधील नव्या रुग्णांची रोजची संख्या नऊ हजारांवरून सात हजाराच्या खाली आली आहे. पंजाबमध्ये घरी विलगीकरण करणाऱ्या रुग्णांना प्रत्येकी दहा किलो पीठ, दोन किलो हरभरा डाळ आणि दोन किलो साखर अशी मदत दिली जात आहे. याशिवाय केंद्राची दहा किलो पीठाचेही वितरण केले जात आहे.

हेही वाचा: केरळच्या मंत्रीमंडळात 'राष्ट्रवादी पुन्हा!'; मिळालं मंत्रीपद

पंजाबच्या उपाययोजना

  • तातडीच्या कोविड उपचारांसाठी पंचायत निधी वापरण्याची परवानगी

  • दररोज किमान ५ हजार ते कमाल ५० हजार रुपये खर्च करता येणार

  • विशेष वैद्यकीय शिबिरे आयोजित करण्याची पंचायतींना परवानगी

  • गावात बाधित व्यक्तींनी प्रवेश करू नये म्हणून गावकऱ्यांना गटागटाने गस्त घालण्याचे आवाहन

  • सध्याच्या दोन हजार ४६ आरोग्य केंद्रांशिवाय आणखी ८०० केंद्रे लवकरच सुरू होणार

सुरवातीलाच वैद्यकीय मदत घ्या

पंजाबमध्ये मध्यम स्वरूपाच्या आजारासाठी ६४ टक्के, तर गंभीर आजार असलेल्या रुग्णांसाठी ८५ टक्के खाटांचा वापर होत आहे, अशी माहिती देऊन अमरिंदर म्हणाले की, लोकांनी आजारपणाच्या सुरवातीलाच वैद्यकीय मदत घेतली असती तर अनेक मोलाचे जीव वाचले असते हेच यावरून दिसून येते. एक कर्णधार या नात्याने मी एकटा संसर्ग रोखण्यासाठी काहीही करू शकणार नाही. त्यासाठी संघातील प्रत्येकाला भरीव प्रयत्न करावे लागतील.

loading image
go to top