केरळ मंत्रीमंडळात 'राष्ट्रवादी पुन्हा'; मिळालं मंत्रीपद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

केरळच्या मंत्रीमंडळात 'राष्ट्रवादी पुन्हा!'; मिळालं मंत्रीपद

केरळच्या मंत्रीमंडळात 'राष्ट्रवादी पुन्हा!'; मिळालं मंत्रीपद

तिरूअनंतपुरम : केरळ विधानसभा निवडणुकीत (Kerala Assembly Election) विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा डाव्यांनी सत्ता स्थापन केली आहे. या विजयानंतर 18 दिवसांनी म्हणजेच आज गुरूवारी पी. विजयन यांनी दुसऱ्यांदा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. विजयन हे 76 वर्षांचे असून मागील 40 वर्षांत पहिल्यांदाच सलग दुसऱ्यांदा शपथ घेणारे ते पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या या मंत्रीमंडळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसलाही एक मंत्रीपद मिळाले आहे. (Kerala A K Saseendran to continue as NCP minister in new Kerala government)

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेंट्रल स्टेडियममध्ये छोटेखानी कायर्क्रमात केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी पी. विजयन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. विजयन यांच्यासह 20 आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली. कोरोनाचे कारण देत विरोधी पक्षातील नेते या शपथविधीला उपस्थित राहिले नाहीत.

हेही वाचा: VIDEO: 'मी विष्णुचा कल्की अवतार, ऑफिसला येऊ शकत नाही'

हेही वाचा: 'अ‍ॅम्फोटेरिसिन'चा प्रश्न लवकरच सुटेल; केंद्राची ग्वाही

विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये दोन मंत्री वगळता सर्व चेहरे नवीन आहेत. दोन दिवसांपूर्वीच कम्युनिस्ट पक्षाने मागील मंत्रीमंडळातील एकाही आमदाराला पुन्हा संधी दिली जाणार नसल्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार आज शपथ घेतलेल्या 20 जणांमध्ये डाव्या पक्षातील एकाही जुन्या मंत्र्याचा समावेश नाहीये. या मंत्रीमंडळात केवळ जेडीएसचे नेते के. कृष्णनकुट्टी आणि राष्ट्रवादीचे नेते ए. के. शशीधरन यांचाच समावेश आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी शशीधरन आणि विजयन यांना ट्विटरवरून शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: मोदींची आजची बैठक हि 'फ्लॉप मिटिंग' : ममता बॅनर्जी; व्हिडिओ

शशिधरन हे मागील सरकारमध्ये जलसंधारण व परिवहनमंत्री राहिले होते. केरळमधील राष्ट्रवादी पक्षाचे ते प्रमुख नेते आहेत. केरळमध्ये राष्ट्रवादीला यावेळी दोन जागा मिळाल्या आहेत. त्यामध्ये शशीधरन यांच्यासह थॅामस के थॅामस यांचा समावेश आहे. मागील काही वर्षांपासून राष्ट्रवादीची केरळमध्ये डाव्यांसोबत आघाडी आहे.

दरम्यान, विजयन यांच्या मंत्रीमंडळामध्ये तीन महिला आमदारांचाही समावेश करण्यात आला आहे. मागील सरकारमध्ये केवळ दोन महिला मंत्री होत्या. त्यामध्ये आरोग्यमंत्री के. शैलजा यांचा समावेश होता. कोरोना काळात प्रशंसनयी कामगिरी केल्यामुळे त्यांचे केरळसह जगभरात कौतुक झाले आहे. पण या मंत्रीमंडळातून त्यांनाही डच्चू देण्यात आला आहे. त्यामुळे केरळमध्ये अनेकांनी याबाबत नाराजीही व्यक्त केली आहे.

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top