Chandigarh News : पंजाबच्या दोन मजुरांची हत्या करणारा दहशतवादी आदिल मंजूर गजाआड

श्रीनगर येथे पंजाबच्या दोन मजुरांची हत्या करणारा दहशतवादी आदिल मंजूर याला सोमवारी अटक करण्यात आली.
Crime
CrimeeSakal

चंडीगड - श्रीनगर येथे पंजाबच्या दोन मजुरांची हत्या करणारा दहशतवादी आदिल मंजूर याला सोमवारी अटक करण्यात आली. आदिल हा पाकिस्तानस्थित म्होरक्यांच्या संपर्कात होता आणि त्याला श्रीनगरच्या जलदागर भागात अटक करण्यात आली. पंजाबहून कामानिमित्त श्रीनगरला आलेले अमृतमाल सिंग आणि रोहित मस्सी यांची ७ फेब्रुवारी रोजी हत्या करण्यात आली होती.

पोलिस महासंचालक कुमार बिर्डी यांनी पत्रकारांशी बोलताना, पंजाबच्या दोन मजुरांच्या हत्येच्या प्रकरणाचा उलगडा झाला असून संशयित आरोपीच सूत्रधार असल्याचे आढळून आल्याचे सांगितले. त्याने सात फेब्रुवारी रोजी या मजुरांवर हल्ला केला होता. याप्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले. दहशतवादी आदिल मंजूरला निर्देश देणाऱ्याविरुद्ध कारवाई केली जाईल.

हँडलर स्थानिक असेल तर त्याच्या कुटुंबाविरुद्ध देखील कारवाई केली जाईल, अशी माहिती त्यांनी दिली. पोलीस निरीक्षक मसरुर हल्ला प्रकरण एनआयएकडे सोपविल्याचे ते म्हणाले. सध्या श्रीनगरमध्ये एकच दहशतवादी मोमीन अहमद हा सक्रिय आहे. जम्मू काश्‍मीर भागात २५ स्थानिक आणि २५ ते ३० परकी दहशतवादी लपलेले असून ते काश्‍मीरच्या वरच्या भागात राहत असल्याचे ते म्हणाले.

७ फेब्रुवारीची घटना

७ फेब्रुवारी रोजी अमृतपाल सिंग यांना गोळी मारण्यात आली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच अन्य व्यक्ती रोहित मस्सी यांना रुग्णालयात नेण्यात आले आणि नंतर एसकेआयएमएसकडे पाठविण्यात आले. मात्र रोहित यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले. दोघेही अमृतसरचे रहिवासी होते. दोघेही अमृतसरहून श्रीनगरला परतले होते आणि घरी जात होते.

श्रीनगर पोलिसांनी घटनास्थळाची चाचपणी केली आणि काही संशयितांवर लक्ष ठेवले. त्यानुसार पुरावे मिळाले असता मुख्य आरोपी आदिल मंजूर लांगू याला अटक केली. आदिल मंजूरने पाकिस्तानात असलेल्या म्होरक्याच्या मार्फत कारस्थान रचले आणि हत्याकांड घडवून आणले. पाकिस्तानच्या हँडलरने आदिलला कट्टरपंथीय केले आणि त्याला दहशतवादी हल्ला घडवून आणण्याची चिथावणी दिली. या कारस्थानानुसार हँडलरने त्याला शस्त्रे पुरविली होती.

यानंतर आदिलने शैला कदल भागात पंजाबच्या दोन मजुरांवर हल्ला केला. या हल्ल्याची जबाबदारी लष्करे तय्यबाशी संबंधित संघटना टीआरएफने सोशल मीडियाच्या माध्यमातून स्वीकारली होती. त्यानंतर पोलिस महासंचालकांनी जम्मू काश्‍मीरच्या पोलीस अधिक्षकांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com