या गावापुढं शहरंही पडतील फिकी; काय आहे खासीयत जाणून घ्या | Punsari Village | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ideal Village Punsari
या गावापुढं शहरंही पडतील फिकी; काय आहे खासीयत जाणून घ्या | Punsari Village

या गावापुढं शहरंही पडतील फिकी; काय आहे खासीयत जाणून घ्या

गुजरातच्या अहमदाबाद शहरापासून (Ahmedbad, Gujrat) सुमारे 100 किमी अंतरावर पुंसरी गाव (Punsari Village) नावाचे एक आदर्श गाव आहे. १५ वर्षांपूर्वीपर्यंत हे गाव साबरकांठा जिल्ह्यातील (Sabarkantha District) इतर गावांप्रमाणेच होते. इथेही अनेक समस्या होत्या. पण 2006 मध्ये हिमांशू पटेल यांची पुंसरीच्या (Himanshu Patel) सरपंचपदी निवड झाल्यानंतर या गावाचे नशीबच पालटले. प्रगत पायाभूत सुविधा असलेली अंगणवाडी केंद्रे, वातानुकूलित शाळा, बायोमेट्रिक मशिन, वायफाय, कचरामुक्त आणि स्वच्छ रस्ते, क्लोज सर्किट कॅमेरे, बायोगॅस प्लांट, पाणी शुद्ध करणारे प्लांट, या सर्व उपलब्ध सुविधांमुळे हे गाव एखाद्या शहरालाही मागे टाकते. (Punsari is an ideal village with more facilities than cities)

हेही वाचा: गाव झाली शाळा, भिंती झाल्या फळे; अकोला जिल्ह्यात प्रथम उपक्रम

योजनांची अंमलबजावणी

हिमांशू पटेल यांनी गावच्या सरपंचपदाची धुरा सांभाळल्यानंतर त्यांनी या गावाचे संपूर्ण चित्रच बदलून टाकले. खरे तर चर्नोईची जमीन विकून मिळालेल्या पैशातून स्वतःचा विकास न करता त्यांनी गावाचा विकास करण्याचे व्रत घेतले आणि शेवटी गावाचा संपूर्ण कायापालट करून पुंसरी गावाला आदर्श गाव बनवले. माजी सरपंच त्यांच्या एका मुलाखतीत म्हणाले होते, 'सरकारी योजनांचा योग्य अवलंब केल्यास गावांचे चित्र बदलू शकते. फक्त इच्छाशक्ती असली पाहिजे.

मोबाइल लायब्ररी-

वाचनाची आवड असलेल्या गावातील लोकांसाठी फिरते वाचनालय तयार करण्यात आले आहे. यासाठी एक ऑटो वापरली जाते, ज्यामध्ये शेकडो पुस्तके आहेत. यासाठी ठराविक वेळेत ही ऑटो वेगवेगळ्या ठिकाणी पोहोचते जेणेकरून लोकांना दूर न जाता त्यांच्या आवडीची पुस्तके वाचता येतील. गावात पाच शाळा असून सर्व शाळांत एसी बसवलेले आहेत. लोकांना चांगले उपचार मिळावेत म्हणून गावात हॉस्पिटलही सुरू करण्यात आले आहे.

हेही वाचा: Video : गोबरगॅसचे गाव : चंदगड तालुक्यातील मांडेदुर्ग

इतर गावेही पुंसरीच्या वाटेवर-

'पुंसरी'चे विकास मॉडेल केवळ राजस्थानच नाही, तर पंजाब आणि तामिळनाडूसारख्या राज्यांतील गावांनीही स्वीकारले आहे. या मॉडेलवर राजस्थानातील अनेक गावांचा विकास केला जात आहे. राजस्थानच्या जयपूर, पाली, उदयपूर, डुंगरपूरसह असे अनेक जिल्हे आहेत, जिथे या गावाचे विकास मॉडेल पाहण्यासाठी 500 हून अधिक सरपंच आले आणि या गावाच्या धर्तीवर आपल्या गावांचा विकास करत आहेत.

Web Title: Punsari Is An Ideal Village With More Facilities Than Cities

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :villagecityInfrastructure