esakal | सप कार्यकर्त्यांकडून गंगाजलाद्वारे शुद्धिकरण
sakal

बोलून बातमी शोधा

 CM Yogi Adityanath

सप कार्यकर्त्यांकडून गंगाजलाद्वारे शुद्धिकरण

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

संबळ (उत्तर प्रदेश)(पीटीआय) ः उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण तापू लागले आहे. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी भेट दिलेली ठिकाणांचे समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी गंगाजल वापरून शुद्धिकरण केले. या प्रकाराचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खळबळ उडाली.

समाजवादी पक्षाच्या युवजन सभेचे प्रदेशाध्यक्ष भावेश यादव यांच्यासह आठ ते दहा कार्यकर्त्यांविरुद्ध याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून यादव यांना पोलिसांनी अटक केली. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते मंगळवारी संबळ जिल्ह्यातील कालिया देवी येथे २७५ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. आदित्यनाथ यांनी यावेळी सभेलाही संबोधित केले.

हेही वाचा: भारतातील मुस्लिमांच्या जन्मदरात घट; अमेरिकेन संस्थेच्या सर्व्हेचा निष्कर्ष

त्यानंतर दुसऱ्या दिवशी समाजवादी पक्षाच्या युवजन सभा या युवा आघाडीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या सभास्थळाचे तसेच हेलिपॅडचेही गंगाजल शिंपडून शुद्धिकरण केले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी येथील कालिया देवी मंदिराला भेट न देऊन देवीचा अपमान केल्याचा आरोप भावेश यादव यांनी केला. मात्र, सप कार्यकर्त्यांच्या या कृतीविरुद्ध संबळमधील एका रहिवाशाने पोलिसांत तक्रार दाखल केली.

यापूर्वी समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी २०१७ मध्ये विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर लखनौतील शासकीय निवासस्थानाचे पुजाऱ्यांनी धार्मिक विधीद्वारे शुद्धिकरण केल्याचा आरोप केला होता.

loading image
go to top