मृतदेह घेऊन निघालेल्या रुग्णवाहिकेचा भीषण अपघात, पिकअपला मागून धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू

Ambulance Rams Into Pickup पूर्वांचल एक्सप्रेस वेवर रुग्णवाहिकेनं पिकअपला मागून धडक दिल्यानं भीषण दुर्घटना घडलीय. या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला असल्याचं समजते. धुक्यामुळे हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे.
Ambulance Rams Into Pickup

Ambulance Rams Into Pickup

Esakal

Updated on: 

उत्तर प्रदेशातील बाराबंकी येथे पूर्वांचल एक्स्प्रेस वेवर शनिवारी सकाळी भीषण अपघात झाला. राजस्थानमधून मृतदेह घेऊन पश्चिम बंगालला जाणाऱ्या रुग्णवाहिकेने पुढे चाललेल्या पिकअपला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात रुग्णवाहिकेतील पाचही जणांचा मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांचे मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत.

Loading content, please wait...