

sir election commission
esakal
उत्तराखंड: उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी रविवारी डेहराडूनमधील मुख्य सेवक सदन येथे पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाची कार्यपद्धती, विशेष सखोल पुनरीक्षण (SIR), EVM, युवकांना रोजगार आणि पेपरफुटीच्या मुद्द्यांवर काँग्रेसच्या आरोपांना उत्तर दिले. निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांवर प्रश्न उपस्थित करताना संपूर्ण तथ्य आणि अधिकृत नोंदी तपासणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
SIRच्या प्रक्रियेवरून काँग्रेसकडून उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रश्नांवर बोलताना धामी यांनी आयोगाच्या अंतिम निर्णयांवर भर दिला. अंतर्गत टिपण्या किंवा आक्षेपांना थेट संस्थात्मक मतभेद म्हणून मांडणे योग्य नसल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या मते, आयोगाच्या अंतिम आदेशांच्या आधारेच त्याच्या निर्णयांचे मूल्यमापन केले पाहिजे.