

Cultural Diplomacy Ahead of the Visit: Russian Art Exhibition in Delhi
Sakal
नवी दिल्ली : येत्या 4 व 5 डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत व रशियाच्या दरम्यान असलेल्या २३ व्या वार्षिक शिखर परिषदेसाठी भारताला भेट देणार आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबर भारताचे संबंध तणावग्रस्त असताना, रशियाकडून खनिज तेल खरेदी विक्रीवर ट्रम्प यांनी बंधने घातली असताना व दुतर्फा व्यापारविषयक वाटाघाटी अर्धवट राहिल्या असताना होणारी पुतिन यांची दिल्ली भेट भारत-रशिया मैत्री भक्कम पायावर उभी आहे, हेच दर्शविणार आहे. भेटीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीतील रशियन दूतावासाने दिलेली जाहिरात व त्यातील राजदूत डेनिस आलिपोव्ह यांचे वक्तव्य बरेच काही सांगून जाते. या जाहिरातीत रशियाचे राष्ट्रीय कलाकार निकास सॅफ्रोनोव्ह यांचे स्वतःचे पोर्टेरेट आहे. त्याचबरोबर त्यांनी काढलेली आणखी दोन पेंटिंग्ज दिसतात.