PWDतून निवृत्त अभियंत्याच्या ठिकाणांवर छापे; लाखोंची रोकड, २.५ किलो सोनं, ५.६ किलो चांदी अन् १७ टन मध जप्त

GP Mehra : सार्वजनिक बांधकाम विभागातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झालेल्या अभियंत्याच्या निवासस्थानासह अनेक ठिकाणी छापे टाकण्यात आले. यात लाखोंची रोकड, अडीच किलो सोनं आणि साडेपाच किलो चांदी जप्त करण्यात आलीय.
PWD Retired Engineer GP Mehra Raid Cash Gold Silver and 17 Tons of Honey Seized

PWD Retired Engineer GP Mehra Raid Cash Gold Silver and 17 Tons of Honey Seized

Esakal

Updated on

मध्य प्रदेशात सार्वजनिक बांधकाम विभागातील माजी अभियंत्याच्या घरी छाप्यात मोठं घबाड आढळून आलंय. मोठ्या प्रमाणावर रोकड जप्त करण्यात आलीय. प्रमुख अभियंत्याच्या निवासस्थानी छाप्यात लोकायुक्तांनी २६ लाख रुपये रोकड, सोनं, चांदी आणि मालमत्तेची कागदपत्रं जप्त केली. याशिवाय लोकायुक्तांनी मोठ्या प्रमाणावर मध आणि इतर वस्तूही जप्त केल्या आहेत. माजी अभियंत्याने ही सर्व संपत्ती त्याच्या कार्यकाळात भ्रष्टाचारातून कमावल्याचा संशय लोकायुक्तांना आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com