राणी लक्ष्मीबाई: शौर्य आणि पराक्रमाची अतुलनीय कथा

queen of jhansi lakshmibai punyatitini 2022 rani lakshmibai death anniversary marathi story
queen of jhansi lakshmibai punyatitini 2022 rani lakshmibai death anniversary marathi story
Updated on

भारतात जेव्हा जेव्हा महिला सक्षमीकरणाची चर्चा होते तेव्हा तेव्हा महान वीरांगना राणी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाची गोष्ट मोठ्या अभिमानाने सांगितली जाते. राणी लक्ष्मीबाई ही केवळ एक महान वीरांगना नाही तर त्या सर्व महिलांसाठी आदर्श आहेत. देशाच्या पहिल्या स्वातंत्र्यलढ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या राणी लक्ष्मीबाईंच्या शौर्याने आश्चर्यचकित होऊन इंग्रजांनी त्यांचे कौतुक केले होते, असे सांगितले जाते.

राणी लक्ष्मीबाईंचे जीवन

राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म १९ नोव्हेंबर १८२८ रोजी काशीतील वाराणसी येथील अस्सीघाट येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव मोरोपंत तांबे आणि आईचे नाव भागीरथीबाई होते. त्यांचे बालपणीचे नाव 'मणिकर्णिका' होते, पण मणिकर्णिकाला प्रेमाने 'मनु' म्हणत. मनू अवघ्या चार वर्षांची असताना तिची आई वारली. त्यानंतर मग मोरोपंत मनूसोबत झाशीला गेले.

राणी लक्ष्मीबाईंनी त्यांचे बालपण आजोबांच्या घरी घालवले. जेथे त्यांना छबिली म्हणूनही ओळखले जात होते. 12 वर्षांची असताना त्यांचा विवाह झाशीचे राजे गंगाधर राव यांच्याशी झाला. लग्नानंतर मनुचे नाव लक्ष्मीबाई ठेवण्यात आले. राणी लक्ष्मीबाई यांच्या लग्नानंतर त्यांच्या झाशी या राज्याची आर्थिक स्थिती मोठया प्रमाणात सुधारली.

राणी लक्ष्मीबाई या समीकरण आणि शस्त्रास्त्रांमध्ये अत्यंत कुशल होत्या. त्यांनी झाशीच्या किल्ल्याच्या एक महिला सैन्य उभे केले होते. त्या स्वतः मर्दानी पोशाख परिधान करुन फेरफटका मारत असत. हे सर्व पाहून त्यांचे पती राजा गंगाधररावांना खूप कौतुक वाटे. पुढे काही काळानंतर राणी लक्ष्मीबाई गरोदर राहिल्या त्यांनी मुलाला जन्म दिला. पण काही महिन्यांनी ते बाळ मरण पावले.

आपल्या राजगादीचा वारस असा लहानपणीच निर्मित्याने हिरावून घेतला. यामुळे संकटांचा डोंगर गंगाधररावांवर कोसळला. आणि दुःखी झालेल्या गंगाधररावांनी २१ नोव्हेंबर १८५३ रोजी आपले प्राण सोडले. राजांच्या जाण्यामुळे झाशी दुःखात बुडाली आणि याचवेळी इंग्रजांनी त्यांच्या कुटील धोरणाचा अवलंब करुन झाशीवर हल्ला केला. यावेळी मग राणी लक्ष्मीबाई यांनी तोफांशी लढण्याची रणनीती आखून आपल्या विश्वासू लोकांना तोफखान्याचे नेतृत्व करण्यासाठी पाठवले. शत्रूचा पराभव करण्यासाठी गडावरील कडक बिजली, घनगर्जन, भवानीशंकर इत्यादी तोफांचा वापर केला.

queen of jhansi lakshmibai punyatitini 2022 rani lakshmibai death anniversary marathi story
तो चमत्कार तर घडणारच आहे, पण..; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

राणी लक्ष्मीबाईंचे चंडी रूप

१४ मार्च १८५७ पासून सलग आठ दिवस तोफखाना किल्ल्यावरून गोळीबार करत राहिला. लक्ष्मीबाईंची तटबंदी पाहून ब्रिटीश सेनापती हुरोज थक्क झाला. राणी रणचंडीचे खरे रूप धारण करून ती आपला दत्तक पुत्र दामोदरराव यांना पाठीवर घेऊन भयंकर युद्ध लढत राहिली.

या लढाईत झलकारीबाई आणि मुंदर सखींनीही रणांगणात आपले मोठे कौशल्य दाखवले. पुढे मग सुरक्षिततेच्या हेतुने झाशीच्या काही सैनिकांनी राणीला काल्पीकडे जाण्याचा सल्ला दिला.

आपल्या स्वःतच्या भरवशाच्या लक्ष्मीबाई चार-पाच घोडेस्वार घेऊन काल्पीकडे त्या निघाल्या. आणि त्याचवेळी ब्रिटीशांना खबर लागली की राणी लक्ष्मीबाई काल्पीकडे जात आहेत. यानंतर कॅप्टन वॉकरने त्याचा पाठलाग करून लक्ष्मीबाईंना जखमी केले.

queen of jhansi lakshmibai punyatitini 2022 rani lakshmibai death anniversary marathi story
कोण पाहणार तुमचा DP?तुम्हीच ठरवा! Whatsapp ची नवी सेटिंग

लक्ष्मीबाईंची अंतिम लढाई

काही कारणास्तव २२ मे १८५७ रोजी क्रांतिकारकांना काल्पी सोडून ग्वाल्हेरला जावे लागले. त्यानंतर १७ जून रोजी पुन्हा युद्धाचे रनशिंग फुकारले गेले. त्यावेळी राणीलक्ष्मी यांनी चढवलेल्या भीषण हल्ल्यांमुळे इंग्रजांना माघार घ्यावी लागली.

या युध्दात राणी लक्ष्मीबाई विजयी झाल्या. परंतु १८ जून रोजी ह्युरोस अचानक स्वतः युद्धभूमीवर परतला. तेव्हा राणी लक्ष्मीबाईंनी आपला दत्तक पुत्र दामोदररावांना रामचंद्र देशमुख यांच्या स्वाधीन करुन त्या पुन्हा शत्रुसोबत लढायला सज्ज झाल्या.

पुढे लक्ष्मीबाई घोड्यावर स्वार होऊन निघाल्या पण त्यांचा घोडा सोनरेखा नाला ओलांडू शकला नाही. त्याचवेळी एका सैनिकाने राणीवर मागून तलवारीने भयंकर असा प्रहार केला की तिच्या डोक्याची उजवी बाजू कापली गेली आणि डोळा बाहेर आला. जखमी होऊनही तिने त्या इंग्रज शिपायावर वार केले आणि मग आपला प्राण सोडला. १८ जून १८५७ रोजी बाबा गंगादास यांच्या झोपडीत या शूर राणीचा मृत्यू झाला. तिथे राणी लक्ष्मीबाईवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

राणी लक्ष्मीबाईंनी बालपणीच सिद्ध केले की त्या एक उत्तम सेनापतीच नाही तर एक कार्यक्षम प्रशासकही आहे. त्या महिला सक्षमीकरणाच्या बाजूनेही होत्या. त्यांनी आपल्या सैन्यात महिलांची भरती केली होती. आज काही लोक जे स्वत:ला महिला सशक्तीकरणाचे नेते म्हणवतात ते महिलांना सैन्यात पाठवण्याच्या विरोधातही आहेत.पण या सगळ्यासाठी राणी लक्ष्मीबाई हे उत्तम उदाहरण आहे. की महिलांची इच्छा असेल तर त्या कोणतेही पद मिळवू शकतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com