
कोण पाहणार तुमचा DP?तुम्हीच ठरवा! Whatsapp ची नवी सेटिंग
व्हॉटसप आपल्या युजर्ससाठी रोज काहीतरी नवीन आणत आहे. सतत विविध फिचर्स पुरवत आहे. आत्ताही एक अशीच प्रायव्हसी सेटिंग Whatsapp घेऊन आलंय, ज्याची वाट आपल्यापैकी अनेक युजर्स बघत असतील. काय आहे ही सेटिंग? जाणून घ्या...(New Privacy setting by Whatsapp)
हेही वाचा: स्मार्टफोनची स्क्रीन लॉक असतानाही पाठवा WhatsApp मेसेज, जाणून घ्या कसे
या नव्या सेटिंगमुळे (Privacy Setting by Whatsapp) आता आपला फोटो, अबाऊट आणि लास्ट सीन कोणाला दिसणार यावर युजर नियंत्रण ठेवू शकणार आहे. केवळ युजरने निवडलेल्या कॉन्टॅक्ट्सलाच फक्त या गोष्टी दिसतील. हे सेटिंग अद्याप अधिकृतरित्या लाँच झालेलं नाही. मात्र, काही विशिष्ट युजर्सला ही सेटिंग करता येणार आहे. हे प्रायोगिक तत्वावर राबवलं जाणार आहे.
हेही वाचा: Whatsapp वर कॅप्शनसहीत फोटो फॉरवर्ड करता येणार; कसं? जाणून घ्या ट्रिक
आत्तापर्यंत युजर्सला आपला प्रोफाईल फोटो, लास्ट सीन आणि अबाऊट कोणाला दिसणार यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तीन प्रकारचे प्रायव्हसी पर्याय (Privacy options in Whatsapp) मिळत होते- Everyone, My Contacts, Nobody. मात्र आता चौथा पर्यायही उपलब्ध करुन देणार आहे, तो म्हणजे My Contacts except.... या पर्यायामुळे आता युजर्स आपल्याला नको असलेल्या व्यक्तीला आपला प्रोफाईल फोटो, अबाऊट आणि लास्ट सीन पाहण्यापासून रोखू शकणार आहेत.
Web Title: Whatsapp Now Lets You Hide Your Profile Picture And Last Seen Status From Specific People
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..