Hatras - सामूहिक बलात्कार प्रकरणी पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

सकाळ ऑनलाईन टीम
Thursday, 1 October 2020

या प्रकरणावर उत्तर प्रदेशातील पोलिसांवर प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे.

लखनऊ: हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या वक्तव्यांनी आता प्रश्न चिन्ह निर्माण झालं आहे. या घटनेनंतर पीडित मुलीच्या मृत्यूनंतर तिच्यावर बलात्कार झाला नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या एका निवेदनात पीडितेवर झालेल्या अत्याचाराला दुजोरा दिला नाही. ते फॉरेन्सिक चौकशी अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याचे त्यांनी सांगितलं.

पोलिस अधिक्षकांनी सांगितलं आहे की, 'पीडित मुलीला अलीगढच्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजमध्ये दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय अहवालात पीडितेच्या शरीरावर जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, पण जबरदस्तीने शररसंबंधांची केला असल्याचं मात्र खात्रीशीर सांगता येत नाही असं म्हटलं आहे.'

हेही वाचा - हाथरसची घटना म्हणजे देशावरील न पुसला जाणारा डाग ; अभिनेता फरहान अख्तरची उद्विग्नता

फॉरेन्सिक चौकशी अहवाल प्रतीक्षेत-
पोलिस अधिक्षक म्हणाले आहेत की, आम्ही फॉरेन्सिक अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. डॉक्टरांनी सांगितलं आहे की, ते  फॉरेन्सिक अहवालाशिवाय बलात्काराला पुष्टी देऊ शकत नाहीत. जेव्हा त्यांना एफएसएलचा अहवाल मिळेल तेव्हा पुढील कारवाई केली जाईल.दरम्यान, शवविच्छेदन अहलवाल आला असून त्यामध्ये बलात्कार झाल्याचा उल्लेख केलेला नाही.

हेही वाचा - धक्कादायक! हाथरसनंतर बलरामपूरमध्ये सामूहिक बलात्कार; तरुणीचा मृत्यू

पीडितेच्या सांगण्यावरून आरोपींवर बलात्काराचे कलम-
पीडितेच्या वक्तव्याच्या आधारे पोलिसांनी सामूहिक बलात्काराच्या कलम आरोपींवर लावले आहे. घशाचे हाड तूटल्याने मृत्यू झाल्याचे कारण सांगितलं जात आहे. 

प्रकरणाचा तपास एसआयटीकडे-
 विशेष तपास पथक बुधवारपासून तपासाला सुरुवात केल्याची माहिती पोलिस अधिक्षकांनी दिली. पथकाने गावात जाऊन पीडित परिवारीशी चर्चा केली आहे. हे पथक अजून गावातच असून पुढील चौकशी करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Question mark arising on police investigation in hathras case