ऐश्वर्या राय विरोधात सासूकडून एफआयआर दाखल

वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

  • सून ऐश्‍वर्याविरोधात राबडींचा एफआयआर 

पाटणा : बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडीदेवी यांनी त्यांची सून ऐश्‍वर्याच्या विरोधात पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे. सचिवालय पोलिस ठाण्यात तो दाखल करण्यात आला. आमच्या घरात फूट पाडण्याचा ऐश्‍वर्याचा प्रयत्न असल्याचा आरोप राबडीदेवी यांनी केला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

या निमित्ताने राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांच्या घरातील वाद आता चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान, मला केस ओढून मारले असल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री राबडी देवी यांच्या सूनबाई ऐश्वर्या राय यांनी केला आहे. पाटण्यातील त्यांच्या निवासस्थानाबाहेर मोठे नाट्य घडले असून राबडी देवी यांच्यावर सूनेने मारहाणीचा आणि जबरदस्तीने बंगल्याबाहेर काढल्याचा आरोप केला आहे.

पाहा रजनीकांत यांचा मराठी बाणा

हा प्रकार समजल्यानंतर ऐश्वर्या रायचे वडील आणि आमदार चंद्रिका राय यांनी राबडी देवी यांच्या निवासस्थानी धाव घेतली आहे. या संदर्भात, सचिवालय पोलिस ठाण्यात राबडी देवी यांच्याविरोधात एफआयआरही नोंदवण्यात आला असल्याचे सांगण्यात येत आहे. दुखापतीमुळे ऐश्वर्याला रुग्णालयात नेण्यात आले आहे. यावेळी ऐश्वर्या म्हणाली की, 'राबडी देवींनी माझ्या केसांना पकडून मला मारहाण केली. त्यानंतर १० सर्क्युलर रोडवर असणाऱ्या बंगल्यातून अंगरक्षकांकरवी मला घराबाहेर काढले'.

राज्य नाट्य स्पर्धेत कोल्हापूर केंद्रावर फिनीक्सची बाजी

ऐश्वर्या आणि राबडी देवी यांच्यामध्ये वादावादी झाल्याचे समजल्यानंतर सचिवालय पोलिस स्टेशनचे पोलिस पथक राबडी देवी यांच्या निवासस्थानी आले होते. राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांचा मुलगा तेजप्रतापबरोबर ऐश्वर्याचे लग्न झाले आहे. पाटण्याच्या व्हीव्हीआयपी झोनमध्ये लालूप्रसाद यादव यांचा बंगला आहे. संध्याकाळी सहाच्या सुमारास ऐश्वर्या बंगल्याबाहेर आली व तिच्याबरोबर काय घडले त्याची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. तेजप्रतापला ऐश्वर्या रायपासून विभक्त व्हायचे आहे. त्यासाठी त्याने नोव्हेंबर २०१८ मध्ये घटस्फोटाची याचिका दाखल केली आहे. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून ऐश्वर्या रायने सासूबाईंवर आरोप करण्याची ही दुसरी वेळ आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rabri Devi Filed FIR against Aishwarya Rai