कार रेसर अश्विन सुंदरचा अपघातात मृत्यू

वृत्तसंस्था
शनिवार, 18 मार्च 2017

कारने पेट घेतल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांनी चेन्नई पोलिसांना दिली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात लवकर यश आले नाही. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले काढले.

चेन्नई - कार रेसर अश्विन सुंदर आणि त्याची पत्नी निवेधिता यांचा आज (शनिवार) पहाटे अपघातात मृत्यू झाला. 

चेन्नईतील संतहोम हाय रोडवर आज पहाटे अश्विन व त्याची पत्नी बीएमडब्लू कारमधून जात असताना अपघात झाला. अश्विनची कार झाडाला धडकल्याने गाडीने पेट घेतला. या आगीत या दोघांचा होरपळून मृत्यू झाला. अश्विन व त्याच्या पत्नीला कारचे दरवाजे उघडता आले नाहीत. अपघाताच्यावेळी अश्विन गाडी चालवत होता. निवेधिता डॉक्टर होती ती एका खासगी रुग्णालयात नोकरीला होती. 

कारने पेट घेतल्यानंतर याबाबतची माहिती नागरिकांनी चेन्नई पोलिसांना दिली. अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळविण्यात लवकर यश आले नाही. पोलिसांनी कारचा दरवाजा तोडून मृतदेह बाहेर काढले काढले. शवविच्छेदनासाठी हे मृतदेह सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. गाडीच्या रजिस्ट्रेशन नंबरवरुन पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवली. पोरुर जवळच्या अल्पाक्कम येथे अश्विन आणि त्याची पत्नी राहत होते.

Web Title: Racer Ashwin Sundar, wife charred to death after their BMW car catches fire in Chennai