राफेल पहिल्यांदा उतरलं त्या एअरबेसची युद्धांमध्ये महत्वाची भूमिका, जाणून घ्या इतिहास

Rafale base at Ambala steeped in history military significance.jpg
Rafale base at Ambala steeped in history military significance.jpg

नवी दिल्ली- राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात दाखल झाली. हरियाणातील अंबाला हवाईतळ राफेल लढाऊ विमांनाचे घर असणार आहे. या विमानांचा भारतीय हवाई दलाच्या 17 व्या स्क्वॅड्रोन म्हणजेच 'गोल्डन अॅरो'मध्ये समावेश करण्यात येणार आहे. राफेल विमानांच्या आगमनाने अंबाला तळामध्ये आता तीन लढाऊ स्क्वॅड्रोन झाले आहेत. या आधी अंबाला येथे जॅग्वार स्क्वॅड्रोन आहेत.

राफेल विमानांची पहिली तुकडी भारतात दाखल; जाणून घ्या खास वैशिष्ठे
भारतील वायूदलातील अंबाला हवाईतळ सगळ्यात जूने आहे. शिवाय या वायूतळाच्या मागे मोठा इतिहास असून धोरणात्मकदृष्या या तळाला फार महत्व आहे. 1947-48 चे पाकिस्तानसोबतचे युद्ध, कारगिल युद्ध आणि मागिल वर्षी बालाकोटवर करण्यात आलेला हल्ला यामध्ये अंबाला हवाईतळाने मोठी भूमिका बजावली आहे. पहिले जॅग्वारचे दोन स्क्वॅड्रोन, त्यानंतर पहिले मिग-21 बिसन स्क्वॅड्रोन आणि आता राफेल पहिल्यांदा अंबाला हवाईतळात सामील होत आहे.

अंबाला हवाईतळ मोक्याच्या स्थळी आहे. त्यामुळे याचे सामरिक महत्व मोठे आहे. या तळापासून पश्चिम आणि उत्तर सीमेवर एकाच वेळी चांगली पोहोच मिळते. तसेच शत्रूंच्या रेकीपासून वाचण्यासाठी हे ठिकाण चांगलेच आतमध्ये आहे. अंबाला हवाईतळाला मोठा प्रशिक्षण तळ आहे. शिवाय हा तळ सीमेपासून सुरक्षित अंतरावर आहे. लढाऊ विमाने या ठिकाणाहून कोठेही आणि तात्काळ उड्डान घेऊ शकतात. अंबाला हवाई तळ पुरशा खोलीमध्ये आहे. त्यामुळे याठिकाणी बांधलेल्या पायाभूत सुविधांमुळे या तळाचे चांगल्यारितीने संरक्षण होऊ शकते. 

अंबाला हवाईतळावर टेकनिकल सुविधा उपलब्ध आहे. युद्ध स्थितीमध्ये विमानांची ताकद वाढवण्यासाठी याचा उपयोग होतो. स्वातंत्र्याआधी, अंबाला हवाईतळ रॉयल एअर फोर्सचे मुख्यालय होते. 1930 मध्ये पहिली स्क्वॅड्रोन येथे होती. पहिल्या तुकडीला कराचीमध्ये प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली होती, मात्र त्या भागातील स्थानिकांच्या उठावामुळे तुकडी अंबाला येथे आणण्यात आली. सुरुवातीला डी हॅवीललँड 9a आणि ब्रिस्टोल F2B लढाऊ विमाने येथे ठेवण्यात आली होती. त्यानंतर 18 जून 1938 मध्ये अंबालाला कायम स्वरुपातील हवाईतळ करण्यात आले.

भारतात झपाट्याने वाढतीये कोरोनाबाधितांची संख्या; जाणून घ्या सद्यस्थिती!
1965 च्या  युद्धात पाकिस्तानने हवाईतळावर  B-57 बॉम्बरने हल्ला केला होता. यावेळी येथील केवळ एका चर्चचे नुकसान झाले होते. 1971 साली श्रीनगरमधील पाकिस्तानचा हवाई हल्ला रोखण्यासाठी अंबाला तळापासून लढाऊ विमाने उडाली होती. यावेळी भारतीय वायूदलाने मोठा पराक्रम दाखवला होता. कारगिल युद्धामध्येही या तळाने मोठी भूमिका बजावली आहे. 'सफेद सागर' ऑपरेशनच्यावेळी भारताच्या जॅग्वार लढाऊ विमानांनी पाळत ठेवण्याचे काम केले होते. जैश-ए-मोहम्मदच्या तळावर हवाई हल्ला करण्यासाठी मिराज 2000s पाकिस्तानी हद्दीत घुसली होती. यावेळी पाकिस्तानचे लक्ष हटवण्यासाठी अंबाला येथील जॅग्वार विमाने बाहावालपूर येथे उडण्यात आली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com