राफेल उडवणार पाकिस्तान आणि चीनची झोप; शेजाऱ्यांच्या तुलनेत भारताची ताकद किती?

Rafale_deal.jpg
Rafale_deal.jpg

नवी दिल्ली- असामान्य ताकद, अचूक निशाणा आणि बहुउद्देशीय भूमिका यामुळे जगाभरात चर्चेत असणारी राफेल लढाऊ विमाने भारतात आल्याने वायूदलाची क्षमता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विशेष करुन पाकिस्तान आणि चीन या देशांशी सामना करताना राफेल महत्वाची भूमिका बजावणार आहे. चीनसोबत तणाव निर्माण झाला असताना राफेल विमानांचा लष्करात समावेश होणे महत्वाचे आहे. राफेल इतकी क्षमता आणि इलेक्ट्रॉनिक युद्ध प्रणाली असणारे लढाऊ विमान आपल्या शेजारी राष्ट्राकडे नाही. 

राफेल विमाने दाखल होताच राजनाथ सिंहांनी चीनला भरला दम!
राफेल लढाऊ विमान हे 4.5 पीढीतले आहे. त्यामुळे रडारला चकवण्यात हे विमान तरबेज आहे. भारताकडे असणारे मिराज-2000  आणि सुखोई लढाऊ विमाने तिसऱ्या आणि चौथ्या पीढीतील आहेत. त्यामुळे राफेल विमाने दाखल झाल्याने वायूदलाची क्षमता वाढली आहे. राफेल विमाने अंत्यत प्रतिकूल परिस्थितीत योग्यपणे काम करु शकतात. त्यामुळे हिमालय भागात ही विमाने तैनात केल्याने शत्रूंचा सामना करणे शक्य होणार आहे. राफेल लढाऊ विमाने असणारा भारत चौथा देश ठरला आहे. याआधी फ्रान्स, ग्रीस आणि कतार या देशांकडे राफेल विमाने आहेत. 

भारतात नुकतेच दाखल झालेली राफेल विमाने पाकिस्तान आणि चीनकडे असणाऱ्या लढाऊ विमानांपेक्षा थोडीशी जास्तच वरचढ ठरतात. चीनकडे सध्या चेंगदू जे-20 आणि पाकिस्तानकडे जेएफ-16 ही लढाऊ विमाने आहेत. भारताची राफेल विमाने या दोन्ही विमानांपेक्षा अधिक शक्तीशाली असल्याचं तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे.  राफेलमध्ये दोन इंजिन आहेत. तर वैमानिकासाठी एक सिट आहे. चीनचे जे-20 विमानामध्ये दोन इंजिने आहेत. जे-20 हे स्टील्थ लढाऊ विमान आहे. चीन या विमानांचा वापर शत्रूंवर लक्ष ठेवण्यासाठी करतो. मात्र, राफेल विमाने बहुउपयोगी आहेत. पाळत ठेवण्याबरोबर शत्रूंच्या ठिकाणांना लक्ष्य करण्यासाठी यांचा वापर केला जाऊ शकतो. विशेष म्हणजे भारताने आपल्या गरजेनुसार या विमानात बदल करुन घेतला आहे. 

भारतीय राफेल 24,500 किलोचे वजन पेलू शकते, तर चीनचे जे-20 34 ते 37 हजारांचे वजन पेलू शकते. राफेलची रेंज चीनच्या जे-20 पेक्षा अधिक आहे. राफेल विमानाची रेंज 3,700 किलोमीटची आहे, तर जे-20 ची रेंज 3400 किलोमीटरची आहे. भारतीय राफेलचा वेग 2130 किलोमीटर प्रति तास आहे, तर जे-20 चा वेग 2100 किलोमीटर प्रति तास आहे. या दोन्ही विमानांवर 4 क्षेपणास्त्रे लावण्यात आली आहे. राफेल विमान तुलनेने लहान असल्याने डोंगराळ भागातून ही विमाने सहजतेने उडू शकतात.

राफेलची काय आहेत वैशिष्ठे? जाणून घ्या सर्वाधिक शक्तिशाली विमानाबद्दल
राफेलवर स्थित असणारी क्षेपणास्त्रे विमानाला विशेष लढाऊ विमान बनवतात. राफेलमध्ये मीटियॉर क्षेपणास्त्र आहे. मीटियॉर हवेतून हवेत मारा करु शकते. याची मारक क्षमता 150 किलोमीटरची आहे, म्हणजे हे मिसाईल 150 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शत्रूच्या ठिकाणांना अचूक लक्ष्य करु शकते. राफेलमध्ये स्काल्प क्षेपणास्त्रही आहे. स्काल्पची मारक क्षमता 600 किलोमीटरची आहे. त्यामुळे 600 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या शत्रूचा खात्मा क्षेपणास्त्र करु शकते. चीनच्या जे-20 विमानावरील क्षेपणास्त्राची क्षमता 200 किलोमीटरपेक्षा जास्त सांगितली जाते. मात्र, राफेलच्या तुलनेत जे-20 ची क्षमता कितीतरी कमी आहे. 

पाकिस्तानचे एफ-16 विमाने राफेलपेक्षा एक पिढीने मागे आहेत. एफ-16 विनामे 1973 लावी बनवण्यात आली होती, तर राफेल 1986 साली बनवण्यात आली आहे.  एफ-16 ची मारक क्षमता 4220 किलोमीटरची आहे, तर राफेलची मारक क्षमता 3700 किलोमीटरची आहे. राफेलचा वेग एफ-16 पेक्षा जास्त आहे. राफेल 2130 किमी तास वेगाने उडू शकते. एफ-16 चा वेग 1500 किमी प्रति तास आहे. राफेल विमानाची रेंज क्षमता एफ-16 पेक्षा अधिक आहे. राफेल विमान पाकिस्तानच्या एफ-16 पेक्षा अत्याधुनिक आहे. त्यामुळे पाकिस्तान एफ-16 राफेलचा समोरासमोर सामना करु शकत नाही

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com