
केरळमध्ये १५ वर्षांच्या विद्यार्थ्यानं रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केलीय. पीडित विद्यार्थ्याच्या आईने सोशल मीडियावर पोस्ट केली असून त्यात गंभीर असे आरोप केले आहेत. शाळेतीलच एका विद्यार्थ्यांच्या गटाने रॅगिंगची हद्द पार केली. मुलाचं रॅगिंग झाल्याचा आरोप करताना आईने म्हटलं की, मुलाला जबरदस्तीने वॉशरूममध्ये नेलं. त्याला टॉयलेट सीट चाटायला लावली. त्याला इतकं छळलं आणि अपमान केला की शेवटी त्यानं आत्महत्या केली. या प्रकरणाची चौकशी व्हावी आणि आरोपींना कठोर शिक्षा करण्याची मागणी पीडित विद्यार्थ्याच्या आईने केलीय.